Nashik Kumbh Mela | नाशिककरांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील रस्त्यांना मिळणार अतिरिक्त निधी

Nashik Kumbh Mela |सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आणखी 250 ते 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
road
road
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आणखी २५० ते ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (१ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्याचे आश्वासन पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

road
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

याच बैठकीत साधुग्रामच्या भूसंपादनाचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता असून, पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. २८) मंत्री महाजन यांनी बैठक घेतली. यावेळी सिंहस्थासाठी सुरू असलेल्या २९ रस्त्यांच्या कामांचा रस्तानिहाय आढावा घेतला. तसेच साधुग्रामच्या तयारीचे सादरीकरण आयुक्त खत्री यांनी महाजन यांच्यासमोर केले. साधुग्राममध्ये सेक्टरनिहाय उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची माहितीही यावेळी दिली.

साधुग्रामच्या भूसंपादनाचा तिढा जवळपास सुटला असून, शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निश्चित केलेल्या सूत्रानुसार मोबदला देण्याचा विचार सुरू आहे. यातून शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊन मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे खत्री यांनी सांगितले. दरम्यान, सिंहस्थासाठी सुरू असलेली डांबरी रस्त्यांची कामे मार्चपूर्वी, तर काँक्रिटीकरणाची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले आहेत.

मनपा निधी कॉलनी रस्त्यांसाठी

सिंहस्थाच्या निमित्ताने सध्या सुमारे १,४०० कोटी रुपये खर्चून २९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय महापालिकेकडून काही नवीन रस्त्यांचे प्रस्ताव प्राधिकरणामार्फत शासनाकडे सादर केले आहेत.

त्यासाठी शासनाकडून सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तर महापालिकेचा स्वनिधी कॉलनी रस्त्यांच्या कामांसाठी राखून ठेवणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली जाणार असल्याचे खत्री यांनी स्पष्ट केले.

road
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

महालक्ष्मी इन्फ्रावर कारवाई

सिंहस्थ निधीतून मखमलाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या महालक्ष्मी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार असल्याची माहिती आयुक्त खत्री यांनी दिली. संबंधित ठेकेदाराकडून काम अत्यंत संथगतीने सुरू असून, सिंहस्थातील अन्य रस्त्यांच्या तुलनेत या कामाची प्रगती पिछाडीवर आहे.

त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हे काम अन्य ठेकेदाराकडे सोपविणार आहे. दरम्यान, डांबराच्या उपलब्धतेचा आणि दरवाढीचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री महाजन हे एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचेही खत्री यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.