Nashik Shalarth ID Scam | शालार्थ घोटाळ्यातील फरार अधिकाऱ्यांचा शोध सुरू

Nashik Shalarth ID Scam | राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बनावट 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
Shalarth ID scam
Shalarth ID scampudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बनावट 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणातील फरार शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला असून, जामीन फेटाळल्यानंतर शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण आणि शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

Shalarth ID scam
Nashik-Pune Railway | नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी गोंदे फाट्यावर जनसागर; समृद्धी महामार्गही आंदोलकांनी रोखला!

अटकेपासून बराच काळ संरक्षण मिळाल्यानंतर आता न्यायालयीन दिलासा संपुष्टात आल्याने तपास यंत्रणेने त्यांच्या संभाव्य ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच बोगस शालार्थ आयडी मिळवून देणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक आणि एजंटही एसआयटीच्या रडारवर आले आहेत.
राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या या घोटाळ्यात भाजप पदाधिकारी तथा शिक्षण संस्थाचालक संशयित संजय भास्कर गरुड याच्या अटकेनंतर तपासाला वेग आला आहे.

गरुडच्या शेंदूर्णी एज्युकेशन सहकारी सोसायटीच्या १५ शाळांमधील मुख्याध्यापकांना एसआयटीने चौकशीसाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार बुधवारी नाशिकरोड गुन्हे शाखेच्या कार्यालयात १० ते १२ मुख्याध्यापक हजर झाले. त्यांच्या बोगस वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी तसेच नियुक्तीच्या कागदपत्रांबाबत सायंकाळपर्यंत कसून चौकशी करण्यात आली. गरुड हा २००६ पासून जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील 'शेंदूर्णी एज्युकेशन सहकारी सोसायटी'चा अध्यक्ष आहे.

संस्थेतील १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी मिळवून दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी १४१ कर्मचाऱ्यांचे मंजुरी आदेश एकाच दिवशी, २८ ऑगस्ट २०१९ रोजी काढण्यात आले होते. या आदेशांवर तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बच्छाव यांच्या भूमिकेकडेही तपास यंत्रणेचे विशेष लक्ष आहे.
मुख्याध्यापकांच्या चौकशीत संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रत्यक्षात कधी झाली, त्यांची शैक्षणिक पात्रता काय होती, संस्थेने कोणती कागदपत्रे सादर केली आणि शालार्थ आयडीसाठी कोणत्या पद्धतीने प्रस्ताव पाठवण्यात आले, याची माहिती घेतली जात आहे.

Shalarth ID scam
Nashik Earthquake | रात्री 10 वाजता जमिनीतून मोठा आवाज अन् थरकाप; नाशिक जिल्ह्यात एकाच रात्री भूकंपाचे 4 धक्के

तसेच या प्रक्रियेत मध्यस्थी करणाऱ्या एजंटांची माहितीही एसआयटीकडून संकलित केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात या घोटाळ्यातील आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात आतापर्यंत निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, माजी शिक्षणाधिकारी शंतिकांत हिंगोणेकर आणि संस्थाचालक प्रशांत वाडले यांना अटक झाली आहे.

आता मुख्याध्यापकांच्या चौकशीतून बोगस भरतीचे रॅकेट आणि एजंटांचे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. गरुड याला एसआयटीने सोलापूर येथून अटक केली होती. मात्र गरुड हा सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने वैद्यकीय उपचारांचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयातूनच त्याची चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news