Nashik Shalarth ID Scam |"शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नाशिकमध्ये एसआयटी ॲक्शन मोडवर!; 1,100 पानांचे दुसरे दोषारोपपत्र कोर्टात दाखल"

Nashik Shalarth ID Scam | दोषारोपपत्र दाखल झाल्याने या गुन्ह्याच्या न्यायालयीन सुनावणीला वेग आला आहे.
Nashik Shalarth ID Scam
Nashik Shalarth ID ScamAI image
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात तब्बल १,१०० पानांचे दोषारोपपत्र नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्याने या गुन्ह्याच्या न्यायालयीन सुनावणीला वेग आला आहे.

Nashik Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : शालार्थ आयडी प्रकरणात धुळ्यातून प्रशांत वाडीले यास अटक

या प्रकरणात नितीन उपासनी गेल्या सात महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. तर विद्यमान शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांना यापूर्वी न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. सुनावणीदरम्यान उपासनी यांच्या वकिलांनी त्यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, याबाबत गुरुवारी (दि. १६) पुढील सुनावणी होणार आहे.

एसआयटीच्या तपासात बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घोटाळ्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गुन्हे दाखल झाले असून, एकूण ८४१ बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

Nashik Shalarth ID Scam
Shalarth ID Scam Nashik 2026 | शालार्थ आयडी घोटाळा; संस्थाचालक, अधिकारी यांच्या अटकेची शक्यता

या प्रकरणात एक हजारांहून अधिक संशयितांचा सहभाग असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. दरम्यान, बेकायदेशीर मार्गाने मिळविलेल्या पैशांतून खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपासही सुरू असून, संशयितांच्या अपसंपदेचा शोध घेतला जात आहे. या दुसऱ्या गुन्ह्यात संशयितांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एजंट प्रशांत वाडीले याची पोलीस कोठडी १७ जुलै रोजी संपत असून, पुढील तपासासाठी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news