Nashik Entrepreneurs | नाशिकच्या 7 युवा उद्योजकांची दिल्लीच्या राष्ट्रीय समिटसाठी निवड; स्थानिक व्यवसायांना मोठी संधी

Nashik Entrepreneurs | सातपूर येथे आयोजित दहाव्या राष्ट्रीय यंग उद्योजक समिटमधून नाशिक जिल्ह्यातील सात युवा उद्योजकांची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय समिटसाठी करण्यात आली.
Nashik Entrepreneurs | नाशिकच्या 7 युवा उद्योजकांची दिल्लीच्या राष्ट्रीय समिटसाठी निवड; स्थानिक व्यवसायांना मोठी संधी
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर येथे आयोजित दहाव्या राष्ट्रीय यंग उद्योजक समिटमधून नाशिक जिल्ह्यातील सात युवा उद्योजकांची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय समिटसाठी करण्यात आली. त्यामुळे आता नाशिकच्या स्थानिक उद्योजकतेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.

Nashik Entrepreneurs | नाशिकच्या 7 युवा उद्योजकांची दिल्लीच्या राष्ट्रीय समिटसाठी निवड; स्थानिक व्यवसायांना मोठी संधी
Nashik Property Tax | नाशिक महापालिकेला कर्मचारी टंचाईचा फटका; मालमत्ता कराच्या मागणीत 15 कोटींची घट

यूथएंड उद्योजक महासंघाच्या वतीने, जागतिक उद्योजकता नेटवर्कच्या सहकार्यात तसेच सायडा, वाँशमित्र प्रा. लि. आणि एमआयडीसी उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र यांच्या समन्वयातून दि. २० व २१ नोव्हेंबर रोजी सातपूर येथील एमआयडीसी उद्योजकता व कौशल्य विकास केंद्रात दोनदिवसीय समिटचे आयोजन केले होते.

या समिटसाठी ६३ उद्योजकांनी नोंदणी केली होती, तर सुमारे १५० जणांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३८ उद्योजकांनी कृषी व सूक्ष्म उद्योग, सामाजिक प्रभाव, सर्जनशीलता व तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उद्योग, आरोग्य तसेच खाद्यपदार्थ व आतिथ्यसेवा अशा पाच विभागांत आपल्या व्यवसाय संकल्पना आणि व्यावसायिक प्रारूप सादरीकरण केले.

सादरीकरणातून शुभम पांडे, वृषाली चौधरी, वंदना चव्हाण, माया बलक, संध्या जोगी, दीपिका फसाळे आणि विकास मोरे या उद्योजकांना विविध विभागांत विशेष गौरविण्यात आले. या सातही उद्योजकांची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय समिटसाठी करण्यात आली.

त्यांच्या व्यवसाय संकल्पनांना राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी मिळणार असल्याने नाशिकच्या उद्योजकीय क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. उद्योजकांच्या व्यवसाय संकल्पनांचे परीक्षण करण्यासाठी स्वप्निल शिर्के, दत्तात्रय पवार, अनिकेत काळे, राजीव शिरसाठ, योगेश गायकवाड, प्रल्हाद हंकारे, आदेश मेखे, जमीर सय्यद, चंद्रकिशोर पाटील, डॉ. सुग्रीव शिंदे आणि पवन आहेर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

समिटच्या दुसऱ्या दिवशी 'स्थानिक उद्योगांचा विस्तार आणि सक्षम उद्योगांची उभारणी' या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये सीएसआर बॉक्सचे कल्पेश मोहोड, शुराय अमृततुल्यचे पराग पाटील, कुंभर्थॉन इनोव्हेशन फाउंडेशनचे गिरीश पगारे, रिचाच्या मयुरी पाटील आणि एमआयडीसी उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राचे शेखर जाधव यांनी सहभाग घेतला.

वाँशमित्रचे योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला एमआयडीसी उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राचे संचालक मुकुंद शिंदे, कामगार विकास विभागाच्या प्रादेशिक संचालिका सारिका दफरे आणि केंद्रप्रमुख शेखर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Nashik Entrepreneurs | नाशिकच्या 7 युवा उद्योजकांची दिल्लीच्या राष्ट्रीय समिटसाठी निवड; स्थानिक व्यवसायांना मोठी संधी
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

स्थानिक उद्योजकतेला राष्ट्रीय व्यासपीठ

जिल्ह्यातील युवा, महिला आणि ग्रामीण उद्योजकांच्या व्यवसाय कल्पनांना प्रोत्साहन देणे, त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे आणि बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हा या समिटचा मुख्य उद्देश होता.

दिल्लीतील राष्ट्रीय समिटमध्ये नाशिकचे सात उद्योजक सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला व्यापक ओळख मिळण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवरील उद्योगांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.