School Holidays | शाळांना वर्षातील तब्बल 100 दिवस सुट्टी; 220 दिवस अध्यापनाचा नियम कागदावरच

School Holidays | जानेवारी ते जूनपर्यंत 60 दिवस विद्यार्थ्यांना सुट्ट्या
School Holidays | शाळांना वर्षातील तब्बल 100 दिवस सुट्टी; 220 दिवस अध्यापनाचा नियम कागदावरच
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी ३६४ दिवसांत जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा १२८ दिवस बंद असतात. त्यात ५२ रविवार आणि सार्वजनिक सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एकूण ९० सुट्ट्या असतात. सध्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची अंतिम सत्राकडे वाटचाल सुरू आहे. पुढच्या वर्षी १५ जून रोजी शाळा सुरू होतील.

School Holidays | शाळांना वर्षातील तब्बल 100 दिवस सुट्टी; 220 दिवस अध्यापनाचा नियम कागदावरच
Goa Russian Women Murder Case| मोरजी-हरमलमध्ये दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या; प्रेम, संशय आणि पैशांचा हव्यास उघड

तत्पूर्वी, शाळांना जानेवारी ते जूनपर्यंत ६० दिवस सुट्ट्या असणार आहेत. यात ३७ दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहणार आहेत. वर्षातील किमान २२० दिवस विद्यार्थ्यांचे अध्यापन व्हावे, असे अपेक्षित आहे. मात्र प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र परीक्षा, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा, शिष्यवृत्तीसह अन्य परीक्षांमुळे किमान २५ दिवस जातात. त्यामुळे वर्षातील ३६४ दिवसांत १०० दिवस शाळा बंद तथा अध्यापन बंद असते. दरम्यान, आता जानेवारी महिन्यात शाळांना १२ ते १५ जानेवारीपर्यंत मकरसंक्रांत आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे.

मार्च महिन्यात नऊ, एप्रिल महिन्यात सहा आणि १ मे ते १४ जूनपर्यंत शाळांना ३७ दिवस सुट्टया असणार आहेत. दरवर्षीप्रमाणे १५ जूनपासून शाळा सुरू | होतील. १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन अद्याप कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहावी, अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस अध्यापन व्हावे, असा नियम आहे. मात्र, दरवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात सर्व शाळांची अंतिम सत्र परीक्षा संपवायची. त्यामुळे १५ ते १८ एप्रिलपासून विद्यार्थी शाळेत यायचे बंद व्हायचे. या पाश्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गतवर्षीपासून विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचे नियोजन करत वेळापत्रक निश्चित केले. यंदाही त्यानुसार परीक्षा होतील.

School Holidays | शाळांना वर्षातील तब्बल 100 दिवस सुट्टी; 220 दिवस अध्यापनाचा नियम कागदावरच
Nashik news: शिरपूर येथे रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे एटीएम मशीन चोरणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश

जानेवारी ते जून

जानेवारी (१२ ते १५ जानेवारीपर्यंत मकरसंक्रांतीची सुट्टी, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन)

फेब्रुवारी (१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती)

मार्च (४ मार्च धूलिवंदन, २० मार्च गुढीपाडवा, २१ मार्च रमजान ईद, २७ मार्च रामनवमी, ३१ मार्च महावीर जयंती)

एप्रिल- (३ एप्रिल गुडफ्रायडे, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)

मे व जून : (१ मे महाराष्ट्र दिन, १ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news