Nashik Crime : सातपूरमध्ये भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न; ७ जणांकडून तरुणाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल

Satpur Kidnapping Attempt | सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, मोबाईल शूटिंगच्या आधारे तपास सुरू
Nashik Satpur kidnapping attempt
नाशिकमध्ये भरदिवसा अपहरणनाट्य घडल्याने भीतीचे वातावरण(Pudhari Photo)
Published on
Updated on

Nashik Satpur kidnapping attempt

नाशिक : नाशिकच्या सातपूर परिसरात भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या प्रयत्नामुळे एकच खळबळ उडाली आहे. सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात ६ ते ७ जणांनी एका तरुणाला जबरदस्तीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकाराचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nashik Satpur kidnapping attempt
Zilla Parishad Nashik | नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण

अपहरणकर्त्यांनी अचानक हल्ला चढवत तरुणाला गाडीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीव मुठीत धरून या तरुणाने धैर्य दाखवले व अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट सातपूर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल शूटिंगमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाल्याने पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

या घटनेनंतर सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भरदिवसा झालेल्या अपहरणाच्या प्रयत्नाने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news