Nashik Water Crisis | 'कश्यपी'तील जलसाठा नाशिकसाठी दिलासादायक

Nashik Water Crisis | त्र्यंबकेश्वर परिसरात पावसामुळे आशा पल्लवित
Mumbai Water Crisis
Mumbai Water CrisisPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेला पावसाळा अखेर सुरू झाला असून, त्र्यंबकेश्वर परिसरातील पावसामुळे पाणीटंचाई सोसाव्या लागणाऱ्या नाशिककरांच्या आशा पल्लवित बनल्या आहेत. दरम्यान, शहरासाठी धरणांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आरक्षित पाणीसाठा असून, कश्यपी धरणातही १२०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईच्या झळा कमी होण्याची शक्यता आहे.

Mumbai Water Crisis
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

शहराला मुख्यतः गंगापूर धरण समूह, मुकणे आणि दारणा धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा गंगापूर धरणातून होत असून, येथून दररोज सुमारे १५ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा केला जातो. मुकणे धरणातून दररोज पाच दशलक्ष घनफूट पाणी न उचलले जाते. गंगापूर धरण समूहात गंगापूर, काश्यपी आणि गौतमी या धरणांचा समावेश आहे.

सध्या गोदाघाट, रामकाल पथ, कुंड विस्तारीकरण आदी कुंभमेळ्याशी 5 संबंधित कामे गोदावरी पात्रात सुरू न असल्याने गंगापूर धरणातून नदीत न पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. परिणामी, कश्यपी धरणातील सुमारे १२०० दशलक्ष घनफूट पाणी राखीव न राहिले आहे. भविष्यात पुरेसा पाऊस न झाल्यास हा साठा वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची सुरुवात झाल्याने कश्यपी आणि गौतमी धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे गंगापूर धरणात येणार असल्याने जलसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. मुकणे धरणाची एकूण क्षमता ७,२३९ दशलक्ष घनफूट असून, त्यातील १,६०० दशलक्ष घनफूट पाणी नाशिकसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यापैकी १,२९२ दशलक्ष घनफूट पाणी वापरले गेले असून, सध्या ३०८ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे.

या धरणातून दररोज पाच दशलक्ष घनफूट पाणी उपसले जाते. उपलब्ध साठ्यानुसार मुकणेचे पाणी सुमारे ६१ दिवस, तर गंगापूर समूहातील पाणी सुमारे ५५ दिवस पुरू शकते. दारणा धरणाचे पाणी प्रामुख्याने नाशिकरोड परिसरासाठी वापरले जाते. महापालिकेसाठी येथे २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असले तरी त्याचा संपूर्ण उपसा झाला आहे. आतापर्यंत दारणा धरणातून २२७ दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यात आले आहे.

Mumbai Water Crisis
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

८६८ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक

गंगापूर, कश्यपी आणि गौतमी या धरणसमूहांची एकत्रित क्षमता ९,३५० दशलक्ष घनफूट असून, त्यापैकी ४,६०० दशलक्ष घनफूट पाणी शहरासाठी आरक्षित आहे. सध्या या आरक्षित साठ्यातील ८६८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.

५८ दिवसांचा सुरक्षित साठा

शहरासाठी आरक्षित असलेल्या सर्व स्रोतांमधील एकूण १,१७२ दशलक्ष घनफूट पाणी सध्या उपलब्ध आहे. दररोज सुमारे २० दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा होत असल्याने कोणतीही पाणी कपात न करता हा साठा सुमारे ५८ दिवस पुरू शकतो. त्याशिवाय कश्यपी धरणातील राखीव १२०० दशलक्ष घनफूट पाणीही आवश्यकतेनुसार वापरता येणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news