Nashik Water Problem | नाशिकच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण! 24 गावे-वाड्यांना 5 टँकरचा आधार; टंचाईची तीव्रता वाढली

Nashik Water Problem | अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याचे विरोधाभासी चित्र समोर आले आहे.
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याचे विरोधाभासी चित्र समोर आले आहे. ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटत चालल्याने प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Water Crisis
Nashik Rickshaw | नाशिकमध्ये रिक्षाचालकांचे हाल! 3 दिवसांपासून गॅसपंप कोरडे; 8 एप्रिलला तीव्र आंदोलनाचा इशारा

सध्या जिल्ह्यातील २४ गाव व वाड्यांमधील सुमारे ७ हजार ८३० लोकसंख्येसाठी ५ टैंकर कार्यरत आहेत. यामध्ये ३ गावे आणि २१ वाड्यांचा समावेश आहे. देवळा तालुक्यातील एका गावात, इगतपुरी तालुक्यातील दोन गाव व सात वाड्या तसेच सिन्नर तालुक्यातील १४ वाड्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.

Water Crisis
Singhstha Kumbh Mela Nashik 2026 | सिंहस्थापूर्वी त्र्यंबकेश्वरचा कायापालट! गोदाघाटावर उभारणार गौतम ऋषी अन् गोदावरी मातेच्या भव्य मूर्ती

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली तरी तापमानात वाढ झाल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, साठ्यात हळूहळू घट होत आहे. जिल्ह्यातील धरणसमूहांत सध्या ४८.९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६०.७८ टक्के साठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ३९.३६ टक्के तर गंगापूर धरणात ६५.६३ टक्के पाणीसाठा होता. यावरून एकूण साठा वाढलेला असला तरी गंगापूर धरणातील साठा घटल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news