Nashik Road Railway Station : नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उभारला जाणार पाचवा फलाट

सिंहस्थ कुंभमेळा तयारीला वेग : स्थानकाचे आधुनिकीकरण सुरू
Nashik Road railway station
Nashik Road railway station
Published on
Updated on

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार

येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. या कामांमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून स्थानकाचा चेहरामोहराच बदलणार आहे.

कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक रेल्वेमार्गे नाशिकला येतात. गर्दी व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी स्थानकाचा विस्तार हाती घेण्यात आला आहे. यामध्ये नव्या पाचव्या प्लॅटफॉर्मची उभारणी, विस्तारित परिसर आणि प्रवाशांच्या हालचालीसाठी आवश्यक जागा निर्माण करण्याचा समावेश आहे.

Nashik Road railway station
Nashik Road Railway Station | नाशिकरोड रेल्वे स्थानकावर "शांती आलय"

२१ मे २०२५ रोजी रेल्वे अधिकाऱ्यांनी नाशिकरोड, देवळाली, खेरवाडी आणि ओढा स्थानकांवरील कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर या सर्व स्थानकांच्या विकासासाठी एकूण १०११ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून रेल्वे मंत्रालयाने त्यास औपचारिक मान्यता दिली आहे. यानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकात नवीन रूफ प्लाझा आणि पादचारी पूल उभारले जाणार असून यामुळे प्रवाशांची आवक-जावक अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल. स्थानक परिसर स्वच्छ, आकर्षक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यावर भर देण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकासोबतच लगतच्या एसटी महामंडळ आणि सिटी लिंक बस स्थानकांचाही विकास होणार आहे. या तिन्ही वाहतूक साधनांना एकत्र जोडून प्रवाशांना अखंड आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या विकासकामांमुळे नाशिकरोड रेल्वे स्थानक अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशाभिमुख बनणार आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी नियोजन अधिक सुलभ, सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने होणार आहे.

रेल्वे स्थानकाच्या विकासातील कामे

रेल्वे प्रशासनाने या विकासकामांसाठी तब्बल १६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून स्थानकावरील नवीन इमारत, १२ मीटर रुंद रूफ प्लाझा, ६ मीटर रुंद पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज), २ स्टॅलिंग लाईन्स, तसेच होल्डिंग एरिया उभारणीसारखी मोठी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय, यार्डचे नूतनीकरण, शौचालयांचे सुधारणा काम, तसेच प्रवासी सुविधांचा विस्तार या बाबींनाही प्राधान्य दिले आहे.

प्लास्टिक मुक्तीसाठी उपाय

बाटली मशीन मध्ये टाका आणि पैसे कमवा रेल्वे प्रशासनाचा उपक्रम सुरू असून रेल्वे स्थानकावर तब्बल 25 प्लास्टिक क्रशर मशीन बसवण्यासाठी प्रशासनाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे तर आता दोन मशीन बसवण्यात आले असून नागरिक या मशीनचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहे. रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांच्या मते गर्दीच्या काळात प्लास्टिकने होणारे पर्यावरणाचे नुकसान या मशीनमुळे टाळता येणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news