Nashik Road Firing Case | वर्चस्ववादातून युवकाचा खून, दोघांचा शोध सुरू

नाशिकरोड गोळीबार: 12 जण ताब्यात
Nashik Firing Update
Nashik Road Firing Case Pudhari news network
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जुन्या वैमनस्यातून जुने बिटको हॉस्पिटलशेजारी रविवारी (दि. १६) सायंकाळी सुमित अरुण पगारे याच्यावर गोळीबार करीत खूनप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. जुना वाद मिटवण्याचा आव आणून हातात हात मिळवण्याच्या बहाण्याने गोळ्या झाडून त्याचा खून झाल्याचे उघड झाले. १४ संशयितांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Firing Update
Nashik SIR | नाशिक जिल्ह्यात 'एसआयआर' प्रक्रिया 100 टक्क्यांच्या नजीक; मुदतीच्या अंतिम दिवशी प्रशासनाची धावपळ

सुमित भाटियाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०२३ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल एनडीपीएस गुन्ह्यात मृत सुमित पगारे, त्याचा भाऊ सनी पगारे, अर्जुन पिवाल व मन्ना गांगुर्डे हे मध्यवर्ती कारागृहात होते. यादरम्यान सनी पगारेची पत्नी सना ही अर्जुन पिवालला भेटायला जात असल्याने जेलमध्येच त्यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी अर्जुनने बाहेर आल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली होती. मार्च २०२६ मध्ये अर्जुन आणि मन्ना जेलमधून बाहेर आले. सुमित पगारे हा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता.


रविवारी सायंकाळी सुमित पगारे, फिर्यादी सुमित भाटिया व आकाश बोरडे हे गोसावीवाडीतील दुकानासमोर उभे होते. तिथे आलेल्या राजिक शेखने, आपल्यातील वाद मिटवून टाकू असे सांगत सुमितशी हात मिळवण्याच्या बहाण्याने सुमितच्या पोटात बंदुकीने दोन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर संशयित पसार झाले. मृत सुमितवर सोमवारी सायंकाळी देवळाली गाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती कारागृहात असलेला मोठा भाऊ सनी पगारेला कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधीसाठी आणले होते.

Nashik Firing Update
Pune Nashik Highway Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर दोन तासांची कोंडी; २५ वर्षे घोषणाच, चाकणकरांचा संताप

यावेळी पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, संजय पिसे, अंबड पोलिस ठाण्याचे जयंत शिरसाठ परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. फिर्यादीवरून अर्जुन सुरेश पिवाल, शिवा सुरेश पिवाल, मन्ना भरत गांगुर्डे, राजिक शेख, राहुल सोनवणे, निशांत भारती, शाहीद शेख, आयुष भारती, अक्षद गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवाल, साद पठाण, अमोल उत्तम वाघ आणि पराग मिलिंद कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कारवाईत उपनिरीक्षक जखमी

नाशिकरोड पोलिसांनी २४ तासांत बारा जणांना पकडले. प्रत्यक्ष गोळीबार करणारा राजिक शेख आणि अन्य एकाचा शोध घेतला जात आहे. या कारवाईत उपनिरीक्षक संदीप पवार यांची करंगळी फ्रॅक्चर झाल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news