Nashik SIR | नाशिक जिल्ह्यात 'एसआयआर' प्रक्रिया 100 टक्क्यांच्या नजीक; मुदतीच्या अंतिम दिवशी प्रशासनाची धावपळ

Nashik SIR | मुदत संपल्याने सायंकाळपर्यंत डिजिटायझेशनसाठी धावपळ
Goa SIR Success Special Intensive Revision
Goa SIR Success Special Intensive Revision
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणांतर्गत (एसआयआर) मतदार पडताळणी व संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत सोमवारी (दि. १७) संपत असताना प्रशासनाची अंतिम धावपळ सुरू होती. दरम्यान, दुपारी १२ पर्यंत जिल्ह्यातील एकूण कामांपैकी ९९.९४ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सायंकाळपर्यंत पूर्ण करून जिल्ह्यातील एसआयआर प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Goa SIR Success Special Intensive Revision
Pune Nashik Highway Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर दोन तासांची कोंडी; २५ वर्षे घोषणाच, चाकणकरांचा संताप

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५१ लाख ४ हजार ४५८ मतदार आहेत. यापैकी सोमवारी दुपारी १२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जवळपास १०० टक्के एन्युमरेशन फॉर्म वितरीत केले असून, केवळ १३ फॉर्म वितरीत होणे बाकी आहेत, तर ४० लाख ६६ हजार ९५९ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी ७९.६७ आहे, तर १० लाख ३४ हजार ५४१ फॉर्मचे डिजिटायझेशन अद्याप बाकी आहे.

एकूण कामाचा विचार करता जिल्ह्यातील ५१ लाख १ हजार ५०० मतदारांचे काम पूर्ण झाले असून, २ हजार ९५८ मतदारांचे काम दुपारी १२ ला प्रलंबित होते. हे काम सायंकाळपर्यंत पूर्ण झाले असून, केवळ तांत्रिक प्रक्रिया बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Goa SIR Success Special Intensive Revision
Girish Mahajan | ‘विकसित नाशिक’साठी विकासाचा वेग वाढविणार : मंत्री गिरीश महाजन

मतदारसंघनिहाय पाहता १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात ९९.४१ टक्के काम पूर्ण झाले असून, याच मतदारसंघात जिल्ह्यातील एकूण २ हजार ९५८ प्रलंबित कामांपैकी तब्बल २ हजार ९०२ कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे अंतिम मुदतीच्या दिवशी नाशिक पश्चिममधील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
या मतदार संघात शंभर टक्के काम पूर्ण
कळवण, मालेगाव बाह्य, नांदगाव, मालेगाव मध्य, बागलाण, चांदवड, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, देवळाली, इगतपुरी.

महत्त्वाचे आकडे

  • एकूण मतदार : ५१,०४,४५८

  • कामे पूर्ण : ९९.९४ टक्के

  • कामे प्रलंबित : २,९५८

मतदारसंघनिहाय स्थिती

  • नाशिक पश्चिम : ९९.४१ टक्के; २,९०२ कामे प्रलंबित

  • कळवण : १०० टक्के; ४० कामे प्रलंबित

  • मालेगाव बाह्य : १०० टक्के; १६ कामे प्रलंबित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news