Nashik Road Bitco Hospital | बिटको रुग्णालयात अखेर 'बोअरवेल' ने पाणीपुरवठा

Nashik Road Bitco Hospital | महापालिका प्रशासनाला उशिराने सुचले शहाणपण : रुग्णांसह नातेवाइकांना दिलासा
Action Against Hospital
Action Against HospitalPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अर्थात बिटको रुग्णालयात दहा दिवसांपासून पाण्यासाठी त्रासलेल्या रुग्ण आणि नातेवाइकांना अखेर दिलासा मिळाला आहे. रुग्णालय आवारात महापालिका प्रशासनाने तत्काळ बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून दिले आहे.

Action Against Hospital
Nashik Kumbh Mela Corruption | सिंहस्थ कामांचे हजारो कोटींचे टेंडर मॅनेज?

वास्तविक, प्रशासनाला उशिरा का होईना, पाण्याची व्यवस्था झाल्याने रुग्णांसह नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. सुमारे अडीच लाख स्क्वेअर फुटांवर बांधलेल्या या रुग्णालयात बाथरूम तसेच पाण्याची अवस्था अत्यंत तोकडी आहे. ३५ रुग्णांच्या वॉर्डासाठी केवळ एकच बाथरूम असल्याने, याठिकाणी महिला रुग्णांची मोठी कुचंबना होते.

अशातच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने, संपूर्ण रुग्णालयात पाणीबाणीची स्थिती निर्माण होते. मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने, पाण्यासाठी रुग्णांसह नातेवाइकांना वणवण करावी लागली.

काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला गेला. मात्र, 千葉नंतर टैंकरही बंद झाल्याने, तब्बल २०० रुग्ण, त्यांचे परिचारिका व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स, पाण्याअभावी मोठे हाल झाले. रुग्णालयात तातडीने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी केली.

महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त यांनीच याप्रकरणी लक्ष केंद्रित करावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अखेर रुग्णालयाच्या आवारात बोअरवेल खोदन पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वास्तविक, रुग्णालयाचा आवाका लक्षात घेता, यापूर्वीच रुग्णालयात बोअरवेल उपलब्ध करून देणे अपेक्षित होते.

Action Against Hospital
Dindori Accident Case| दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समिती नियुक्त

200 रुग्णांना दिलासा

सध्या रुग्णालयात 200 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात पाणीच नसल्याने, या रुग्णांचे मोठे हाल झाले. काही रुग्णांनी इतरत्र उपचार घेण्यासाठी काढता पाय घेतला. नातेवाइकांना देखील पाण्यासाठी वणवण करावी लागली. डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांचे देखील हाल झाले.

रुग्णालयाची क्षमता लक्षात घेता, यापूर्वीच बोअरवेल उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, उशिरा का होईना, प्रशासनाला सुचलेल्या शहाणपणाचे आम्ही स्वागत करतो. रुग्णालयात इतरही बऱ्याच गैरसोयी आहेत. आता त्याकडे महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी लक्ष केंद्रित करायला हवे. - जगदीश पवार, माजी नगरसेवक

रुग्णालयाची क्षमता लक्षात घेता, यापूर्वीच बोअरवेल उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, उशिरा का होईना, प्रशासनाला सुचलेल्या शहाणपणाचे आम्ही स्वागत करतो. रुग्णालयात इतरही बऱ्याच गैरसोयी आहेत. आता त्याकडे महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी लक्ष केंद्रित करायला हवे.

- जगदीश पवार, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news