Nashik Kumbh Mela Corruption | सिंहस्थ कामांचे हजारो कोटींचे टेंडर मॅनेज?

Nashik Kumbh Mela Corruption | नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक
kumbh-mela-nashik Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण आले आहे. मंत्रालयातील लाचखोर कक्ष अधिकारी विलास लाड याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नाशिक
Drowning Death | दिंडोरी तालुक्यात शोककळा! दोन वेगवेगळ्या घटनांत 4 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

या क्लिपमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या टेंडर प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यवहार आणि कमिशन फिक्स झाल्याचे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. मात्र, या व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. लाचखोरीच्या आरोपाखाली अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) च्या ताब्यात असलेल्या विलास लाडने कथित संभाषणात नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा उल्लेख केला आहे.

या निधीतून विविध कामांची टेंडर प्रक्रिया मॅनेज करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारांमध्ये छोट्या अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची टक्केवारी निश्चित झाल्याचेही तो सांगताना ऐकू येत असल्याचे समोर आले आहे.

सुमारे १,०२१ प्रकारच्या कामांचे टेंडर आधीच ठरवून देण्यात आल्याचे सांगितले जाते. यामधून स्वतःला सुमारे ५०० कोटी रुपयांचा हिस्सा मिळणार असल्याचा दावा लाड करताना दिसतो. ७०० तंबू उभारणी, ई-टॉयलेट्स, स्वच्छता व्यवस्था तसेच भोजन व्यवस्थेची कोट्यवधींची टेंडर मिळाल्याचेही तो सांगतो.

४० दिवसांच्या कुंभमेळ्यात प्रत्यक्ष खर्च कमी असूनही मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळणार असल्याचा दावा या संभाषणात करण्यात आला आहे. तसेच, संबंधित व्यक्तीला तुमच्या ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही टेंडर मिळवून देऊ, असे आश्वासन देतानाही तो ऐकू येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक
Karjat Agriculture Department: कर्जत कृषी कार्यालयात महिला अधिकाऱ्याचा छळ; वरिष्ठांवर गंभीर आरोप

दरम्यान, विलास लाडला नुकतेच सहा लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खारघर परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले होते. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी ही लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून, ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसीबीच्या छाप्यात त्याच्या घरातून दोन लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

सखोल चौकशीची मागणी

या प्रकरणामुळे नाशिक कुंभमेळ्याच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, व्हायरल ऑडिओतील दाव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. अधिकृत तपासानंतरच या आरोपांमागील सत्य स्पष्ट होणार आहे.

कोण आहे विलास लाड ?

विलास लाड हे महाराष्ट्र मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले एक बडे अधिकारी आहेत. लाडला खारघर (नवी मुंबई) येथे निधी मंजुरीच्या बदल्यात ६. ३७ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेमुळे राज्यातील प्रशासकीय भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news