Nashik Road Accident News | म्हसरूळ, एकलहरा रोडवर दोन दुचाकीस्वार ठार

Nashik Road Accident News | शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण ठार व तीन जण जखमी झाल्याची नोंद पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
Ratnagiri Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण ठार व तीन जण जखमी झाल्याची नोंद पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. अपघाताचा पहिला प्रकार म्हसरूळ परिसरात घडला. फिर्यादी ब्रिजेश श्रीसाजराम यादव (रा. उत्तर प्रदेश) यांचा भाऊ जयकर यादव (वय २७) व प्रदीपकुमार पप्पू यादव (वय २०, जेलरोड) हे दोघे त्यांच्या पेंटिंग कामाचे पैसे घेऊन राज स्वीट्स मार्टकडून बळीमंदिराकडे मोटारसायकलीने येत होते.

Ratnagiri Accident
Nashik Heatwave Alert | यंदाचा उन्हाळा ठरणार कडक! मार्चच्या मध्यातच तापमान 40 अंशांवर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज

ते राजमाता मंगल कार्यालयाकडे आले असता बळीमंदिराकडून आलेल्या महिंद्रा पिकअपवरील (एमएच १७, बीवाय ९१०३) चे चालक बाळासाहेब रामचंद्र कातोरे (रा. सांगवी, ता. संगमनेर) याने यादव यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. त्यात फिर्यादीचा भाऊ जयकर याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाला, तर त्यांचा पुतण्या प्रदीपकुमार यादव याला गंभीर दुखापत झाली असून, मोटारसायकलीचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पिकअप वाहनाचे चालक बाळासाहेब कातोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा दुसरा प्रकार एकलहरा रोड येथे घडला. फिर्यादी भिकन मारुती मोरे (रा. एकलहरा गेट, देशमुखवाडी) लहान भाऊ रवींद्र याच्यासह नाशिकरोड येथील काम आटोपून दुचाकीवरून घराकडे चालले होते.

Ratnagiri Accident
यंदाचा उन्हाळा कडक ! एप्रिल ते जून महाराष्ट्र तापणार ; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

हिंगणवेढा ते एकलहरा रोडवर असताना समोरून भरधाव आलेला पिकअप (एमएच १५, ईजी ८७७२) ची त्यांना धडक बसली. यात फिर्यादीचे भाऊ रवींद्र याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालक संतोष बैरागी (रा. नायगाव, ता. सिन्नर) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताचा तिसरा प्रकार जेलरोड येथे घडला. फिर्यादी मनोज शिंदे (रा. लोखंडे मळा, जेलरोड) यांचे वडील नातवाला क्लासवरून घरी आणण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. जेलरोडवरील महारुद्र कॉलनीसमोर भरधाव आलेल्या अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या मोपेडला धडक दिली. त्यात ते जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news