Nashik | खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासीदिनी आज रॅली

आदिवासी उत्सव समितीच्या वतीने आदिवासीदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन
World Tribal Day
जागतिक आदिवासी दिनfile photo
Published on
Updated on

सिन्नर : येथे आदिवासी उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. ९) जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त पायी रॅली, प्रबोधन सभा आदींसह विविध कार्यक्रम होणार आहेत. खासदार राजाभाऊ वाजे, सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष उदय सांगळे, प्रमुख वक्ते साहित्यिक विजयकुमार कर्डक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

World Tribal Day
Varkari Mahakumbh : आदिवासी दिनी अजित पवारांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

पायी रॅलीचे नियोजन असे...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्मा स्मारकापासून पायी रॅलीचे नियोजन केले असून, पुढे बरस्थानकाजवळील महात्मा जोतिबा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्रिशूल व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह अशी होणार आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, आदिवासी नृत्य व कलापथक असणार आहे. यात असंख्य आदिवासी बांधव आपल्या कला व नृत्य सादर करणार आहेत. या रॅलीचे आयोजन गुरुवार (दि.८) रोजी दुपारी १२ पासून सायंकाळी ४ पर्यंत होणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे प्रबोधनपर सभा दुपारी ४ वाजता होणार आहे. आदिवासी बांधवांनी सिन्नर येथे कार्यक्रमासाठी हजर राहावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news