Nashik Rainfall Impact : पावसाच्या दणक्याने भाजीपाल्याचे दर कडाडणार

Vegetable prices increase | गृहिणींना आले टेन्शन; भाजीपाला 20 टक्क्यांनी महागणार
Vegetable prices increase
Vegetable prices increase Pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : जिल्हाभरात गत 4 दिवसांपासून पावसाने थैमान घातल्यामुळे भाजीपाल्यावर संकट आले आहे. पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरी, मकासह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे येत्या 8 दिवसांत भाजीपाल्याचे दर अधिक कडाडण्याची चिन्हे आहेत.

सध्या भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. कांदे बटाट्यासह टॉमेटो, कारले, गिलके, दोडके या भाज्यांनी शंभरी गाठली आहे. गत दोन ते तीन महिन्यांपासून वाढलेल्या दरांमुळे गृहिणी मेटाकुटीला आल्या आहेत. एकीकडे लाडक्या बहिणीला 1500 मिळाल्याचा आनंद अन दुसरीकडे महागाईचा सोस यामुळे गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडले आहे. अशातच गत चार दिवसांपासून पाऊस दणका देत असल्याने पुढील आठवड्यात भाजीपाल्यांचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे. महागाईच्या आगीत तेल ओतले जाणार आहे. दिवाळी तोंडावर असल्याने दिवाळीची खरेदी करणेही आवश्यक आहे.

Vegetable prices increase
Nashik Rain Crop Damage | जिल्ह्यात ९३,३२३ हेक्टरवरील पिके मातीमोल

यंदा पावसाळ्यात पाऊस चांगला झाल्यामुळे भाजीपाला स्वस्त होईल, असा अंदाज केला जात होता. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने ऐन गणेशोत्सव अन नवरात्रोत्सवात भाजीपाल्याचे दर 20 टक्क्यांनी वाढले. वाढलेले दर कमी होण्याची आशा असतानाच आता पावसाने दणका दिला. त्यामुळे 100 ते 120 रुपयांनी विकला जाणारा भाजीपाला दीडशेच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

भाजीपाला बाजारभाव किलोचे संभाव्य दर

  • बटाटे - 70

  • कांदे - 70

  • टोमॅटो - 120

  • कारले - 140

  • वांगे - 150

  • गिलके - 180

  • दोडके - 150

  • कोबी - 40

  • फ्लॉवर - 40

  • मेथी - 60

  • कोथिंबीर - 40

  • लसूण - 550

  • आले - 250

  • घेवडा - 150

  • वाल - 130

  • कारले - 150

Vegetable prices increase
Rain News | परतीच्या पावसाने पुरती दाणादाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news