Nashik Rain Update | आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी

Nashik Rain Update | यलो अलर्ट : दमदार पावसाची मात्र प्रतीक्षा
Nashik Rain Update
शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. छाया-हेमंत घोरपडे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवडाभरापासून दबा धरून बसलेल्या पावसाने बुधवारी (दि. १५) शहराच्या बहुतांश भागात हजेरी लावली. अधूनमधून आलेल्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी, अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या बुधवारी (दि. ८) झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला होता.

Nashik Rain Update
Washim rain | पावसाच्या सरींनी वाशीमकरांना दिला मोठा दिलासा; तापमानाचा पारा घसरला!

त्यानंतर मात्र, पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता पुन्हा पाऊस दमदारपणे सक्रिय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने नाशिकला यलो अलर्ट दिल्याने, पुढच्या काही दिवसांत नाशिकमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

बुधवारी सकाळपासूनच पावसाने भरलेले ढग नाशिकवर दाटून आले होते. दुपारच्या सुमारास वारेदेखील सुटले होते. बहुतांश भागात अचानक काळोख दाटला होता. त्यानंतर आलेल्या सरींमुळे नाशिककरांची एकच धावपळ झाली होती. शहरातील सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, आडगाव, मखमलाबाद, पाथर्डी फाटा यासह अन्य भागात पावसाच्या सरी बरसल्या.

Nashik Rain Update
Latur Rain : लातूर जिल्ह्यात अखेर वरुणराजाचे आगमन

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील बहुतांश भागात पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पावसाने दडी मारल्याने, शेतकरी चिंतेत सापडला असतानाच पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

रिपरिप पावसात रस्त्यांची दैना

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रशासनाच्या रस्ते कामांचे पितळ उघडे पडले. शहरभर रस्ते खोदून ठेवल्याने, या खड्ड्यांमधून वाट शोधताना नाशिककरांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, बुधवारी अधूनमधून बरसलेल्या सरींमुळे रस्त्यांची मोठी दैना झाल्याचे चित्र दिसून आले. अगोदरच रस्त्यांवर धुळीची सादर (चादर) पसरलेली असल्याने, पावसाच्या सरींमुळे रस्ते पुन्हा एकदा चिखलमय झाले. यावरून वाट शोधताना नाशिककरांना मोठी कसरत करावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news