Nashik Rain Red Alert | खासगी क्लासेस, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन

Nashik Rain Red Alert | महापालिका हद्दीतील सर्व खासगी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व खासगी आस्थापना, कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Konkan Rain Alert
कोकण किनार्‍यावर पावसाचा इशाराfile photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीतील सर्व खासगी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व खासगी आस्थापना, कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी (दि. ७) रोजी नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट देत मुसळधार पावसाची, अतिवृष्टी होऊन ढग फुटीची शक्यता वर्तवली आहे.

Konkan Rain Alert
Nashik Municipal Corporation | अग्निशमन भरती : अपात्र उमेदवारांचा संताप

त्या अनुषंगाने नाशिक महापालिका हद्दितील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेस व खासगी आस्थापना, कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवण्यात यावेत. शक्य असेल, तेथे वर्क फ्रॉम होमद्वारे कामकाज करण्यात यावेत. तसेच ज्या इमारतींना बेसमेंट आहेत, तेथे पाणी साचण्याची शक्यता अधिक असून त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच पाणी उपसण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

महापालिका रुग्णालये

बाळासाहेब ठाकरे रुग्णालय,

नाशिकरोड डॉ. कांचन लोकवाणी- ९८६०८१९८८८ डॉ. शिल्पा काळे- ९८५०२२६३७०

सावित्रीबाई फुले रुग्णालय,

सिन्नर फाटा, नाशिकरोड डॉ. प्रशांत शेटे - ९८२३६०३०४० श्रीमती वळवी - ९४२३४७६०१५

इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी डॉ. रिना ढिकले- ९४२२२४६७५५ गंगापूर रुग्णालय, गंगापूर गांव डॉ. योगेश कोशिरे- ९८५०९७४३७७

मायको प्रसूतिगृह, सातपूर, नाशिक डॉ. रुचिता पावसकर- ९४२२२७५७०४

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कथडा, जुने नाशिक डॉ. अविनाश फुलमाळी - ९९२२५९४१०७ श्री.

स्वामी समर्थ रुग्णालय, सिडको डॉ. विनोद पावसकर- ९४२२२७५२२४

जिजामाता प्रसूतिगृह, मेन रोड, नाशिक डॉ. स्वाती सावंत - ९८५०८०८५६५

Konkan Rain Alert
Maharashtra ICT labs : एआय शिकवणार, पण संगणक प्रयोगशाळाच नाही!

महापालिकेच्या वतीने चोवीस तास आपत्कालीन कक्ष आपत्कालीन कक्षाचे ठिकाण फोन नंबर

राजीव गांधी भवन - ०२५३-२५७१८७२/२३१७५०५

पंचवटी विभागीय कार्यालय ०२५३-२५१३४९०

सातपूर विभागीय कार्यालय - ०२५३-२३५०३६७

पूर्व विभागीय कार्यालय - ०२५३-२५०४२३३

पश्चिम विभागीय कार्यालय ०२५३-२५७०४९३

सिडको विभागीय कार्यालय ०२५३-२३९२०१०

नाशिकरोड विभागीय कार्यालय ०२५३-२४६०२३४

मुख्य अग्निशमन केंद्र - १०१, ०२५३-२५९०८७१

पंचवटी अग्निशमन केंद्र - ०२५३-२५१२९२९

सातपूर अग्निशमन केंद्र - ०२५३-२३५०५००

सिडको अग्निशमन केंद्र - ०२५३-२३९३९६१

नाशिकरोड अग्निशमन केंद्र ०२५३-२४६१३७९

के. के. वाघ महाविद्यालय ०२५३-२६२९१०४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news