

सातपूर (नाशिक) : रविवारी (दि. १५) दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. तसेच अनेक नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरल्यामुळे प्रचंड हाल झाले.
श्रमिकनगर परिसरातील विष्णुनगरमध्ये श्री गुरुदत्त मंदिराच्या समोर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. घरात शिरलेले पाणी उपसावे लागले. नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. श्रमिकनगर येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे.