नाशिक : वनवास काळात प्रभू श्रीरामाचे वास्तव्य असलेल्या नाशिकच्या तपोभूमीत श्रीरामाचे फायबर-रिइन्फोर्ड पॉलिमर या मटेरियलपासून सुमारे ५५ फूट उंचीचे भव्य शिल्प साकारण्यात आले आहे. या शिल्पाचे लवकरच मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे.
तपोवनाची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून रामसृष्टी उद्यानात भव्यदिव्य असे श्रीरामांचे शिल्प उभारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे.
येत्या काही दिवसात या पूर्णकृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून नागरिकांना दर्शनासाठी तो खुले केले जाणार आहे. श्रीरामांचे शिल्प उभारताना फायबर-रीइन्फोर्ड पॉलिमर या मटेरियलचा वापर करण्यात आलेला आहे. धातूंच्या मूर्तीवर होणाऱ्या ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार करून या मूर्तीमध्ये फायबर-रीइन्फोर्ड पॉलिमरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा यावर कुठलाही दुष्परिणाम होणार नसून हे अधिक टिकाऊ असणार आहे.
लवकरच दिवाळीच्या सुट्या लागणार असून, या काळात पर्यटकांचा ओघ वाढतो. तत्पुर्वी शिल्पाचे लोकार्पण होणार असल्याने त्याचा भाविकांना व पर्यटकांना लाभ होणार आहे.