Nashik Police Advisory | पीडित महिलांची ओळख उघड करू नका; अन्यथा कारवाई

Nashik Police Advisory | भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील आवाहन करण्यात आले आहे.
Solapur Spa Center Raid |
Solapur Spa Center Raid | सोलापुरात स्पा सेंटरवर छापा; चार पीडित महिलांची सुटका.File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड करू नये, असे स्पष्ट निर्देश पोलिसांकडून सर्व माध्यम प्रतिनिधी तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संबंधित घटकांना दिले आहेत.

Solapur Spa Center Raid |
Manmad Indore Railway Project | मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी घरे, जमीन मोजमाप सुरु

काही वृत्तवाहिन्या इन्स्टाग्राम हॅन्डल्स, युट्यूब न्यूज पोर्टल्स, ऑनलाइन न्यूज साइट्स आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवरून करण्यात येणाऱ्या वृत्तांकनातून पीडित महिलेची ओळख अप्रत्यक्षपणे उघड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

काही ठिकाणी पीडितेचा चेहरा ब्लर करून व्हिडिओ दाखविले जात असले, तरी तिचा पेहराव, अंगकाठी, उंची, हालचाली आणि हावभाव यावरून संबंधित व्यक्तींच्या ओळखीच्या लोकांना तिची ओळख पटत असल्याचे समोर आले आहे.

Solapur Spa Center Raid |
Gas Cylinder Crisis 2026 | 20 टक्के गॅस कोटा निर्णय तोंडाला पाने पुसणारा

या प्रकारामुळे संबंधित महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ७२(१) नुसार, कोणत्याही पीडित महिलेची ओळख उघड होईल, असे कृत्य करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वृत्तांकन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते,

असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. याशिवाय काही सामाजिक संस्था पीडित कुटुंबीयांना भेटून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. या कृतीमुळेही ओळख उघड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news