Nashik City Police | 'टीम कर्णिक' यांच्या कारवाईची सोशल मीडियावर चर्चा

Nashik City Police | सराईताच्या अटकेच्या थरारक व्हिडिओला २४ तासांत तब्बल १७ लाख व्ह्यूज
Police
PolicePudhari
Published on
Updated on
Summary
  • १७ लाखांपेक्षा जादा व्ह्यूज

  • ७०,००० लाईक्स

  • ४०,००० शेअर

नाशिक : निखिल रोकडे
नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने सराईत गुन्हेगार स्वप्निल उर्फ भूषण सुनील गोसावी याला महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः चर्चेत आला आहे.

Police
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा वाद अखेर सुटणार! डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

नाशिक शहर पोलिसांनी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओला अवघ्या २४ तासांत १७ लाखांहून अधिक व्ह्यूज, ७० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि तब्बल ४० हजारांहून अधिक नागरिकांनी शेअर केला आहे. पोलिसांच्या धाडसी कारवाईचे नागरिकांनी समाजमाध्यमांवर भरभरून कौतुक करत, "कायदाच सर्वात मोठा... नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला" हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याच्या प्रतिक्रिया आहेत.


"कोणी मला हात लावू शकत नाही... माझं नाव भूषण गोसावी आहे... पैज लावतो, मला आणून दाखव पाहू," अशी ऑडिओ क्लिप व्हायरल करून थेट नाशिक शहर पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या सराईत गुन्हेगार स्वप्निल उर्फ भूषण सुनील गोसावी याचा अखेर गुंडाविरोधी पथकाने महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून खेळ खल्लास केला.

राहुरी साखर कारखाना परिसरात स्कोडा कार अडवून भूषण गोसावी व त्याचा साथीदार आकाश दीपक गायकवाड यांना जेरबंद करण्यात आले. या कारवाईत एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे १० लाखांची स्कोडा कार (एमएच ३९, जे ३१४७) जप्त करण्यात आली.


भूषण गोसावीने जुन्या वादातून उपनगर परिसरात वाहनांची तोडफोड, गोळीबार आणि दहशत निर्माण केल्यानंतर सोशल मीडियावर पोलिसांना उघड आव्हान दिले होते. त्यानंतर गुंडाविरोधी पथक, नाशिकरोड युनिट आणि नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीआधारे आरोपीचा माग काढला.

अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, अकोले आदी ठिकाणी लपून राहत असलेल्या आरोपीचा अखेर संगमनेर-राहूर-लोणीमार्गे कोल्हार परिसरात शोध लागला. राहुरी साखर कारखान्याकडे स्कोडा कारने जात असताना पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.


यापूर्वी २० जुलैला जयभवानी रोड परिसरात विजय उर्फ छंगा बेहनवाल टोळीने कोयत्याने हल्ला, तोडफोड आणि दहशत माजवल्यानंतर त्या टोळीतील विजय उर्फ छंगा सरजीत बेहनवाल, योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर, प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे आणि सचिन उर्फ अन्नू राधेश्याम गवंडर यांनाही गुंडाविरोधी पथकाने नारायणगाव येथील कला केंद्रातून जेरबंद केले. या सलग धडक कारवायांमुळे नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.

Police
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा वाद अखेर सुटणार! डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ नाशिक शहर पोलिसांनी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. लाखो नागरिकांनी व्हिडिओ पाहत पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले असून, हजारो नागरिकांनी तो शेअर करून गुन्हेगारीविरोधातील या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुंडाविरोधी पथक, नाशिकरोड युनिट व नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या कामगिरीमुळे पुन्हा एकदा "नाशिकचा बालेकिल्ला म्हणजे कायद्याचे राज्य" हे सिद्ध झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news