Road opened at Matane
मटाने येथे पोलीस बंदोबस्तात नाला खुला केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. Pudhari News Network

नाशिक : मटाने येथे पोलीस बंदोबस्तात नाला खुला; शेतकऱ्यांना दिलासा

तहसिलदारांचे नाला खुला करण्याचे आदेश
Published on

देवळा; पुढारी वृत्तसेवा : मटाने येथील नैसर्गिक आवळ्या नाला तहसील प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी (दि. २८) खुला करून दिला. आबा आहेर, बापू आहेर, सजन आहेर, विठ्ल आहेर आदी शेतकऱ्यांनी देवळा येथील जुन्या तहसिल कार्यालयासमोर सहकुटुंब आणि जनावरे घेऊन बुधवारी (दि.२७) लाक्षणिक उपोषण केले होते. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Road opened at Matane
Nashik Zika Virus | धक्कादायक | नाशिक महापालिकेने दडवला 'झिका' रुग्ण

नाला खुला करण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

याबाबत अधिक माहिती अशी की, मटाने (ता. देवळा) येथील नैसर्गिक आवळ्या नाला वहिवाटीसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. भऊर फाटा ते वाजगाव रस्त्यास लागून पूर्व-पश्चिम असा शासकीय नैसर्गिक पूर्वापार आवळ्या नाला आहे. परिसरातील १५ ते २० शेतकरी या नाल्याचा वापर करतात. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नाही.

Road opened at Matane
Nashik Zika Virus | धक्कादायक | नाशिक महापालिकेने दडवला 'झिका' रुग्ण

मागील ३ वर्षांपासून नाल्यातील वहिवाट बंद

मागील ३ वर्षांपासून सामनेवाले यांनी हा नाला बुजवून नाल्यातील वहिवाट बंद केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी नाला पूर्ववत खुला करण्याच्या मागणीसाठी बुधवारी लाक्षणिक उपोषण केले होते. याची दखल घेऊन नायब तहसीलदार बबन अहिरराव यांनी शुक्रवारी सुनावणी घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

Road opened at Matane
नाशिक : विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्च्याचे भरपावसात रास्ता रोको

तहसिलदारांचे तात्पुरत्या नाला खुला करण्याचे आदेश

यानुसार तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी या केसचा न्यायालयात दावा सुरू आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत सद्यस्थितीत नाला खुला करून वहिवाट सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तात्पुरत्या स्वरूपात नाला खुला करण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी , नायब तहसीलदार बबन अहिरराव , मंडळ अधिकारी के. टी. ठाकरे, तलाठी नितीन धोंडगे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news