

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांची अंबड पोलिस ठाण्यात प्रभारी निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, तर भद्रकाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पाटील यांची पंचवटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी बदली करण्यात आली. याशिवाय अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल हांडे हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून, तूर्त त्यांना नियंत्रण कक्ष येथे ठेवण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून सातत्याने पावले उचलण्यात येतात. याचाच भाग म्हणून या बदल्या करण्यात आल्याचे मानले जात आहे.
अंबड पोलिस ठाण्याचे राकेश चौधरी यांना भद्रकाली पोलिस ठाणे येथे प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे, तर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे जयंत शिरसाठ यांच्याकडे उपनगर पोलिस ठाणे, चुंचाळे पोलिस चौकीचे मनोहर कारंडे यांना अंबड पोलिस ठाणे (दुय्यम), सातपूर पोलिस ठाण्याचे विश्वास पाटील यांना चुंचाळे पोलिस चौकी येथे प्रभारी, नियंत्रण कक्षाचे संजय पिसे यांना आडगाव पोलिस ठाणे (प्रभारी), आडगाव पोलिस ठाण्याचे सचिन खैरनार यांना अंबड पोलिस ठाणे (दुय्यम), भद्रकाली पोलिस ठाण्याचे श्रीनिवास देशमुख यांना देवळाली कॅम्प पोलिस ठाणे (प्रभारी), तर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे अशोक गिरी यांना सरकारवाडा पोलिस ठाणे (दुय्यम) अशी जबाबदारी देण्यात आली आहे. नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.