Nashik Ganesh Visarjan | नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा 48 तास 'पहारा'; कडेकोट बंदोबस्त तैनात

Nashik Ganesh Visarjan | जुलूस-ए-गौसियानिमित्त बंदोबस्ताचे आव्हान
Ganesh Visarjan Police Security
Ganesh Visarjan Police Security Pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गणरायाला निरोप देण्यासाठी नाशिक सज्ज झाले असताना, शहराच्या सुरक्षेची धुरा पोलिसांच्या खांद्यावर आहे. शुक्रवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या गणेशविसर्जन मिरवणुकीपासून रविवारी (दि. २७) होणाऱ्या जुलूस-ए-गौसियानिमित्ताच्या मिरवणुकांपर्यंत शहर व ग्रामीण पोलिस दलातील हजारो अधिकारी-कर्मचारी सलग ४८ तास बंदोबस्तावर राहणार आहेत.

Ganesh Visarjan Police Security
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

गणेशविसर्जनाचा जल्लोष, त्यानंतरचे धार्मिक कार्यक्रम, वाढणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीचे आव्हान लक्षात घेता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गणेशविसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळपासून तैनात होणारा पोलिस बंदोबस्त मिरवणूक संपेपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर पुन्हा रविवारी होणाऱ्या जुलुसासाठी पोलिसांना मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या जवानांवर सलग दोन दिवस मोठी जबाबदारी राहणार आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यावर पोलिसांचा विशेष भर आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर तसेच अतितीव्र लेझर लाइट्सच्या वापरावर निर्बंध आहेत. गुलालाची अवाजवी उधळण टाळण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्याची तयारी गणेश मंडळांनी केली आहे. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवर सुरू असलेली विविध विकासकामे, खोदकामे आणि खड्डे हेही प्रशासनासमोरील आव्हान ठरणार आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, मिरवणुका निर्धारित वेळेत पुढे सरकाव्यात आणि अनुचित प्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

ड्रोन, सीसीटीव्हीचे कवच

मिरवणुकीतील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. प्रमुख चौक, सिग्नल आणि मिरवणूक मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फीड पोलिस आयुक्तालय तसेच स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहे.

त्याचबरोबर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणांवर हवाईनजर ठेवली जाणार आहे. हुल्लडबाजी करणारे तसेच पाकीटमारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नियंत्रण कक्षातून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून संबंधित पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

असा आहे सुरक्षेचा 'मास्टर प्लॅन'

विभाग अधिकारी व कर्मचारी बळ (अतिरिक्त पोलिस दल):

शहर पोलिस आयुक्तालय:

  • उपायुक्त: ०४

  • सहाय्यक आयुक्त: ०७

  • निरीक्षक: ४०

  • सहाय्यक पोलिस व उपनिरीक्षक: १६७

  • अंमलदार (३ शिफ्ट): २५००

  • होमगार्ड: १३००

  • लोहमार्ग, मोबाईल-१ पथके, आरसीपी, क्यूआरटी, क्राईम ब्रँच, एसआरपीएफ

Ganesh Visarjan Police Security
Maternity Benefit Scheme | कुपोषणमुक्तीकडे मोठे पाऊल; लाभार्थी संख्येत नाशिक जिल्हा राज्यात 'नंबर वन'

ग्रामीण पोलिस दल:

  • अधीक्षक: ०१

  • अप्पर अधीक्षक: ०२

  • उपअधीक्षक: ०८

  • निरीक्षक, उपनिरीक्षक: ८०

  • अंमलदार: २०००

  • होमगार्ड: १२२०

  • ५ ते ६ दंगल नियंत्रण तुकड्या

  • ३ राज्य राखीव दल तुकड्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news