Nashik Fake Currency | '10 लाख अस्सल द्या, 30 लाख बनावट घ्या!' नाशिकमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांची धडक धाड

Nashik Fake Currency | खरे दहा लाख रुपये घ्या, खोटे 30 लाख रुपये घ्या!
Fake currency
Fake currency
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव शिवारात एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. बुधवारी (दि. १२) सायंकाळी 'शिवकृपा' बंगल्यावर केलेल्या कारवाईत ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, ९ लाख ७५ हजार रुपयांची अस्सल रोकड, कार व पाच मोबाईल असा १२ लाख १९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Fake currency
Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने 3 कोटींचा गंडा; बनावट वर्कऑर्डर प्रकरणात दोघांना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी!

दरम्यान या टोळीकडून खरे १० लाख रुपये द्या आणि खोटे ३० लाख रुपये घ्या, अशी योजना चालवली जात असल्याचे समोर आले आहे. एलसीबीचे पोलीस शिपाई किशोर गजानन बोडखे यांना तळेगाव येथील बंगल्यात बनावट चलनाची नोटा तयार केल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकला.

त्यावेळी संशयित काळ्या व चॉकलेट रंगाच्या केमिकल लिक्विडचा वापर करून कट केलेल्या कागदांच्या साहाय्याने नोटा तयार करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे आढळले.
या प्रकरणी तेलंगणातील अमरेश्वर सुधाकर आईथा (३७) आणि दासरी प्रसाद सत्यई (३६) तसेच नाशिकमधील गोकुळ आनंदराव दाते (५६), हिरामण पुंजा दाते (५६), गोकुळ दाते यांचा मित्र (मोकळ) आणि मच्छिंद्र भगवान घनदाट अशा सहा संशयितांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake currency
Nashik FDA Raid | FDA चा मोठा दणका! नाशिक जिल्ह्यात नियम मोडणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर कारवाईची कुऱ्हाड

पोलिसांनी ५०० रुपयांच्या केमिकल लावलेल्या बनावट नोटांचे १५ बंडल, विविध बाटल्या व कॅनमधील केमिकल, कागद, ग्लोव्हज, टेपसह अन्य साहित्य जप्त केले. टोळीने यापूर्वी अशा प्रकारे बनावट नोटा कुठे चलनात आणल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

मोडस ऑपरेंडी : केमिकलच्या साहाय्याने नोटांची निर्मिती

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांकडून विशेष प्रकारचे कट केलेले कागद आणि काळ्या-चॉकलेट रंगाचे केमिकल वापरले जात होते. या साहित्याच्या साहाय्याने ५०० रुपयांच्या नोटांसारखे दिसणारे कागदी बंडल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी तयार अवस्थेतील केमिकल लावलेले बनावट नोटांचे १५ बंडल आढळले. या प्रक्रियेत नेमके कोणते केमिकल आणि कोणत्या तंत्राचा वापर केला जात होता, तसेच तयार नोटा कुठे व कोणामार्फत खपवल्या जाणार होत्या, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news