Lasalgaon APMC Onion Price | नाफेड : शासकीय कांदा खरेदीचा फुसका बार

Lasalgaon APMC Onion Price |लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये खरेदीला सुरुवात नाहीच
Onion Price
Onion Price Pudhari
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या वतीने नाफेड व एनसीसीएफमार्फत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात न लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात सोमवारी (दि. ८) दुपारपर्यंत कोणतीही खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. त्यामुळे शासकीय कांदा 5 खरेदीचा उपक्रम केवळ कागदोपत्रीच राहिल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

Onion Price
Nashik Onion Purchase | बाजार समित्यांनी कांदा खरेदी केंद्र सुरु करा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशांनुसार बाजार समित्यांनी खरेदीसाठी आवश्यक तयारी पूर्ण केली होती. मात्र, जिल्ह्यातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या - लासलगावमध्ये नाफेड किंवा एनसीसीएफने खरेदीसाठी कोणतीही हालचाल केली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही खरेदी प्रक्रिया सुरू झाली नसल्यामुळे संबंधित संस्थांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Onion Price
Maharashtra Onion Farmers Protest: पारनेरमध्ये कांदा लिलाव बंद; नाफेड दर निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप

निफाड उपबाजार आवारात राजूरकर बहुउद्देशीय कृषी सेवा सहकारी संस्थेमार्फत चांदवड तालुक्यातील शिंदे-भायाळे येथील शोभा दिलीप आहेर यांच्या ३० क्विंटल कांद्याची १,५८० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. मात्र, ही खरेदी प्रतीकात्मक स्वरूपाची असल्याची चर्चा शेतकरीवर्गात सुरू आहे.

याचवेळी लासलगाव बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांद्याचा सर्वसाधारण बाजारभाव १,६५१ रुपये प्रतिक्विंटल जाहीर झाला. हा दर शासनाच्या १,५८० रुपयांच्या खरेदी दरापेक्षा अधिक असल्यामुळे शेतकरी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. शिवाय शासकीय खरेदीची रक्कम मिळण्यासाठी १५ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे उत्पादकांची अनास्था वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news