

निफाड (नाशिक): किशोर सोमवंशी
ओझर नगर परिषदेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक जागांवर 16 जागांवर विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेना उबाठा गटाला 6 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 5 जागा मिळाल्या.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या अनिता घेगडमल यांनी 10 हजार 650 मते मिळवत प्रतिस्पर्धी जयश्री धर्मेंद्र जाधव (7,447) यांचा 3,203 मतांनी पराभव केला. या निकालामुळे ओझरच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक ठळक झाली आहे. प्रभागनिहाय निकाल पाहता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना विविध प्रभागांत यश मिळाले.
प्रभाग 1 मध्ये देशमुख पल्लवी (भाजप) व जय जाधव (शिवसेना उबाठा) विजयी ठरले.
प्रभाग 2 मध्ये प्रमोद कुटे व वेदांती महेश सूर्यवंशी (दोघेही राष्ट्रवादी अजित पवार गट) यांनी बाजी मारली.
प्रभाग 3 मध्ये भाजपच्या कोमल प्रवीण थूल व योगिता रोशन कदम विजयी झाल्या.
प्रभाग 4 मध्ये अशोक कदम व शिल्पा पगारे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
प्रभाग 5 मध्ये भाजपचे नितीन जाधव व नेहा जाधव निवडून आले.
प्रभाग 6 मध्ये अल्ताफ अत्तार व रोहिणी जाधव (भाजप) यांनी मोठे मताधिक्य मिळवले.
प्रभाग 7 मध्ये सुनील कदम व माया काळे (शिवसेना उबाठा) विजयी ठरल्या.
प्रभाग 8 मध्ये रूपाली प्रकाश महाले (भाजप) व रोहित लभडे (शिवसेना उबाठा)
प्रभाग 9 मध्ये रूपाली शेळके व खंडेराव देवजी जोगारे (भाजप) निवडून आले.
प्रभाग 10 मध्ये नीलेश चौरे व रूपाली आढाव
प्रभाग 11 मध्ये महेश शेजवळ व ज्योती कुंदे (भाजप) विजयी झाले.
प्रभाग 12 मध्ये नीलेश भडके (भाजप) व दीपाली शिंदे (शिवसेना उबाठा) यांनी यश मिळविले.
प्रभाग 13 मध्ये जान्हवी यतीन कदम (भाजप) व उषा रमेश गवळी (राष्ट्रवादी अजित पवार गट) निवडून आल्या.
निकाल जाहीर होताच शहरात विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला. ओझर नगर परिषदेच्या माध्यमातून शहर विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.