Nashik News | कांद्याच्या धसक्याने नाफेडची टीम नाशिक जिल्ह्यात

Nashik News | कांदा खरेदी, गोदाम क्षमता आणि बाजारभावांची घेतली माहिती
Onion price
Onion News | नाफेडचा 15 रुपये खरेदीचा कांदा 7 रुपये किलोने बाजारातPudhari news network
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

कांदा प्रश्नावर राज्यातील वातावरण तापलेले असतानाच नाफेडच्या अधिकाऱ्यांनी पिंपळगाव बसवंतनंतर उमराणा, देवळा आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच नाफेडच्या गोदामाला भेट देत कांदा खरेदीचा आढावा घेतला.

Onion price
Bird Sanctuary Nashik | कमळ पक्ष्यांची सप्टेंबरऐवजी एप्रिलमध्येच वीण

नाफेडच्या गोदामांची पाहणी करून उपलब्ध साठवण क्षमता तसेच नव्याने सुरू होणाऱ्या गोदामांची माहितीही अधिकाऱ्यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या लासलगाव येथील 'कांदा एल्गार' आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १९ मे रोजी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेड गोदामाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.

त्यानंतर नाफेडच्या अधिकाऱ्यांनी उमराणा, देवळा आणि चांदवड बाजार समित्यांचा दौरा केला. केंद्र शासनाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले असले, तरी प्रत्यक्षात केवळ ४४ टन खरेदी झाल्याने अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

बाजार समित्यांमध्ये मिळणारे सध्याचे दर, मागील वर्षातील दर आणि साठवणुकीची व्यवस्था याबाबतही सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रत्येक बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांद्याचे दर दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. यापूर्वी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती.

त्यानंतर सहकारी संस्थांना संधी देण्यात आली होती. यंदा कृषी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याची तयारी सुरू असून, खरेदी केलेला कांदा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साठवला जाणार आहे. कांद्याचे प्रमुख आगार मानल्या जाणाऱ्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असली, तरी खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांची केंद्रे अत्यल्प असल्याने नाफेडच्या खरेदी प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Onion price
Nashik Election 2026 | सिंहस्थ, पावसाळापूर्व कामांना आचारसंहितेचा बसला फटका

कांद्याला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी २६ मे रोजी चांदवड येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याने कांदा प्रश्न आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विशेष पथकाची नियुक्ती केली असून, या पथकामध्ये कृषी विभाग, पणन विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासोबत कांदा खरेदी केंद्र व दराची माहिती याबाबत नाफेडचे मोठे होर्डिंग लावण्याच्या सूचना केल्या आहे. कांदा खरेदी रजिस्ट्रेशनमध्ये आणि पीक पाहणीत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी नाफेड मार्फत यंत्रणा कार्यान्वित केली आहे

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news