Bird Sanctuary Nashik | कमळ पक्ष्यांची सप्टेंबरऐवजी एप्रिलमध्येच वीण

Bird Sanctuary Nashik | पक्षीशास्त्रीय माहितीनुसार भारतात फिजंट-टेल जाकानाचा प्रजनन कालावधी जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात मानला जातो.
Bird Sanctuary Nashik
Bird Sanctuary Nashik
Published on
Updated on

पावसाळ्यात प्रजनन

पक्षीशास्त्रीय माहितीनुसार भारतात फिजंट-टेल जाकानाचा प्रजनन कालावधी जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात मानला जातो. पावसाळ्यात जलवनस्पतींची वाढ, अन्नाची उपलब्धता, पाण्याची पातळी आणि सुरक्षित अधिवास या कारणांमुळे हा कालावधी प्रजननासाठी अनुकूल ठरतो. मात्र, नांदूरमधमेश्वर परिसरात मे महिन्यातच या पक्ष्याची पिले दिसून आली आहेत. मेमध्ये पिल्ले दिसत असतील, तर अंडी घालण्याची आणि उबवण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यातच पूर्ण झाली असण्याची शक्यता आहे. या पक्ष्याने नेहमीच्या प्रजनन हंगामापेक्षा दोन महिने अगोदर वीण सुरू केली आहे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील नांदरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात फिजंट-टेल जाकाना अर्थात कमळ पक्ष्याचे बदललेले वर्तन सध्या पक्षी निरीक्षकांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे. एरवी जून ते सप्टेंबर महिन्यात वीण (प्रजनन) करणारे हे पक्षी आता एप्रिलमध्येच वीण करीत असल्याने त्यांचे बदलेले वर्तन निसर्ग बदलाचे संकेत देत आहेत.

Bird Sanctuary Nashik
Online Life Certificate Pensioners | हयातीचा दाखला आता ऑनलाइन; पेन्शनधारकांना दिलासा

पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी याबाबतचे निरीक्षण नोंदविले आहे. सामान्यतः हा पक्षी पाण्यावर तरंगणाऱ्या कमळाच्या पानांमध्ये किंवा जलवनस्पतींच्या सुरक्षित भागात घरटी बांधून वीण करतो. त्याच्या लांब आणि बारीक पायांमुळे तो पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींवर सहज हालचाल करू शकतो. कमळाची पाने हा त्याचा पारंपरिक अधिवास मानला जातो.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पाणथळ भागात या पक्ष्याचा मोठा अधिवास असून, कमळांची संख्या मोठी आहे. मात्र, हा पक्षी कमळांच्या पानात घरटी करण्याऐवजी जलपर्णीमध्ये प्रजननासाठी जागा निवडत असल्याचे आढळून येत आहे.

हे वर्तनात्मक बदल, तापमानात वाढ, पावसाचे पाणथळ भागात बदलते स्वरूप, पाण्याच्या उपलब्धतेतील बदल, अन्नस्रोतांची वाढ किंवा घट, अधिवासातील बदल आणि स्थानिक परिसंस्थेतील सूक्ष्म बदलाचे संकेत देत आहे. कारण हा पक्षी पर्यावरणातील परिस्थितीनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news