One Nation One Ration Card | नाशिकमध्ये 'वन नेशन, वन रेशन कार्ड'चा मोठा वापर; दोन महिन्यांत 89 हजारांहून अधिक कार्डांची नोंद

One Nation One Ration Card | केंद्र शासनाच्या 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
Nashik Ration Card
Nashik Ration Card
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर २०२६ मध्ये तब्बल ४९ हजार ७०६ रेशनकार्डधारकांनी पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेतला, तर नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध आकडेवारीनुसार ४० हजार १०२ कार्डांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, नाशिक शहर आणि मालेगाव या शहरी भागांत या सुविधेचा वापर सर्वाधिक होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Nashik Ration Card
Drug Case | नाशिकमधील बंद गोदामे पोलिसांच्या रडारवर; ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांची धडक कारवाई

केंद्र शासनाने स्थलांतरित कामगार, मजूर तसेच रोजगारानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कुटुंबांना रेशनचे धान्य मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी 'एक देश, एक रेशनकार्ड' योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या मूळ गावातील रेशनकार्डच्या आधारे देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेता येते.

यासाठी रेशनकार्ड दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याची आवश्यकता नसते. ई-पॉस मशीनच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा पुरवठा विभागाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२६ मधील पोर्टेबिलिटीच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये अंत्योदय अन्न योजना प्रवर्गातील ५ हजार ६११, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रवर्गातील ४४ हजार ९५ कार्डांची नोंद झाली.

या दोन्ही प्रवर्गातील एकूण ४९ हजार ७०६ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर केला. नोव्हेंबरमध्ये एएवाय प्रवर्गातील ४ हजार ६९०, तर पीएचएच प्रवर्गातील ३५ हजार ४१२ कार्डांची नोंद झाली. दोन्ही प्रवर्गातील एकूण आकडा ४० हजार १०२ इतका आहे.

प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक

दोन्ही महिन्यांच्या आकडेवारीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रवर्गातील कार्डांची संख्या सर्वाधिक आहे. ऑक्टोबरमध्ये एकूण ४९ हजार ७०६ कार्डांपैकी ४४ हजार ९५ कार्डे पीएचएच प्रवर्गातील होती. नोव्हेंबरमध्येही ४० हजार १०२ कार्डांपैकी ३५ हजार ४१२ कार्डे याच प्रवर्गातील आहेत. त्यामुळे या योजनेचा सर्वाधिक वापर प्राधान्य कुटुंब प्रवर्गातील रेशनकार्डधारकांकडून होत असल्याचे स्पष्ट होते

Nashik Ration Card
Nashik Water Crisis | नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचा हाहाकार! 10 दिवसांत टँकरवर अवलंबून नागरिकांची संख्या 30 हजारांनी वाढली

नाशिक शहरात सर्वाधिक वापर

तालुकानिहाय आकडेवारी पाहता, ऑक्टोबरमध्ये नाशिक शहरातील एफडीओ कार्यालयांतर्गत सर्वाधिक १७ हजार २ कार्डांची पोर्टेबिलिटी झाली. त्यापाठोपाठ मालेगाव एफडीओ कार्यालयांतर्गत ६ हजार ५०८, नाशिक तालुक्यात ७ हजार ३७२, नांदगावमध्ये ३ हजार ७१९ आणि निफाडमध्ये ३ हजार ८४१ कार्डांची नोंद झाली.

नोव्हेंबरमध्येही नाशिक शहर आघाडीवर असून, येथे १३ हजार ७८ कार्डांची पोर्टेबिलिटी झाली आहे. मालेगावमध्ये ६ हजार २८, नाशिक तालुक्यात ६ हजार २१२, नांदगावमध्ये २ हजार ५४४, तर निफाडमध्ये २ हजार ६५४ कार्डांची नोंद झाली. ग्रामीण भागातही या सुविधेचा वापर होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. दिंडोरी, बागलाण, चांदवड, इगतपुरी, येवला आणि सिन्नर या तालुक्यांमध्येही शेकडो रेशनकार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.