नाशिक: पुढारी वृत्तसेवा – गंगा दशहरा महोत्सवानिमित्त जय श्रीराम… गोदावरी माता की जय अशा जयघोषात गोदाकाठावरील रामकुंड परिसर रविवार (दि १६) दुमदुमून गेला. महिला भाविकांनी रामकुंड फुलून गेला होता.
तब्बल ५२ वर्षानंतर दशमी, हस्त नक्षत्र आणि वरियान योग असा दुर्मिळ त्रियोग जुळून आल्याने भाविकांनी रामकुंडावर येत जलपूजन केले. महोत्सवानिमित्त गोदावरी ५६ भोगचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दरम्यान साेहळ्यानिमितत सायंकाळी १५१ महिलांनी रामकुंडावर गंगा लहरी स्तोत्राचे सामुदायिक पठण केले.
गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने यंदाही माेठ्या उत्साहात गंगा दशहरा महाेत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवानिमित्त श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने सकाळी ७ ते ९ या वेळेत गोदावरीला महाभिषेक करत पूजा करण्यात आली. सायंकाळी ६ वाजता १५१ महिला रामकुंडावर गंगा लहरी स्त्रोतांचे पठण केले. याचबराेबर गंगा दशहरा महोत्सवानिमित्त मूळ प्राचीन गोदावरी महाआरती मित्र मंडळाच्या वतीने ५६ भोग नैवेद्य गोदावरी मातेला अर्पण करण्यात आले.
हेही वाचा :