Nashik Simhastha 2027 Odha Railway |ओढा रेल्वेस्थानकाला सिंहस्थासाठी पाणीपुरवठा

Nashik Simhastha 2027 Odha Railway |आडगाव जलकुंभातून ओझरपर्यंत पाणी नेण्याचा मनपाचा प्रस्ताव
Simhastha Kumbh Mela Nashik
Sinhasta Kumbh Mela | सिंहस्थासाठी रस्ते प्रकल्पाची सज्जताPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ओढा रेल्वेस्थानकासाठी महापालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी नाशिक महापालिकेच्या आडगाव ट्रक टर्मिनस परिसरातील जलकुंभातून ओढा रेल्वेस्थानकापर्यंत तब्बल ७,८७० मीटर लांबीची जलवाहिनी टाकली जाणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Water Crisis | लांजा पूर्व भागात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांनी यासंदर्भात मनपाकडे परवानगी मागितली आहे. त्यानुसार महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सिंहस्थ २०२७ अंतर्गत ओढा रेल्वेस्थानक येथे येणाऱ्या भाविक व प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

योजनेद्वारे दररोज सुमारे १० लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. प्रस्तावानुसार आडगाव शिवारातील मनपा जलकुंभाजवळ ५० हजार लिटर क्षमतेचा आरसीसी संच उभारण्यात येणार असून, त्यावर पंपिंग यंत्रणा बसविण्यात येईल. तसेच सुमारे ७,८७० मीटर लांबीची जलवाहिनी टाकून ओढा रेल्वेस्थानकापर्यंत पाणी पोहोचविण्यात येणार आहे.

मनपा अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर हा प्रस्ताव तयार केला आहे. ट्रक टर्मिनस परिसरात आधीपासूनच १.५ लाख लिटर क्षमतेचा संच उपलब्ध असून, त्यालगतच्या १० मीटर बाय १० मीटर जागेत नवीन संच व यंत्रसामग्री उभारण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Ratnagiri News : पाणी जपा, टंचाई टाळा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पाणीपुरवठ्यासाठी सशर्त परवानगी

महापालिकेने या परवानगीसाठी काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार बांधकामाचा सर्व खर्च संबंधित विभागाने करायचा असून, पाटबंधारे विभागाने सिंहस्थासाठी अतिरिक्त पाणी मंजूर केल्यासच पुरवठा केला जाईल. सिंहस्थ कालावधीपर्यंत आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.

सिंहस्थ संपल्यानंतर संबंधित बांधकाम मनपाकडे हस्तांतरित करणे बंधनकारक राहील. तसेच ही सुविधा केवळ सिंहस्थ कालावधीपर्यंतच वापरता येणार असून, त्यानंतर मनपामार्फत पाणीपुरवठा केला जाणार नाही. विशेष म्हणजे, ज्या जागेची मागणी करण्यात आली आहे, ती मनपाच्या मालकीची असून, ट्रक टर्मिनससाठी आरक्षित आहे.

सद्यः स्थितीत या जागेचा पीपीपी तत्त्वावर विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर होऊन करार प्रक्रियेत आहे. त्यामुळे जलकुंभ कामासाठी आवश्यक तेवढेच क्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news