Nashik Zero Black Spot | मनपाची 'झीरो ब्लॅक स्पॉट ड्राइव्ह' प्रभावी

Nashik Zero Black Spot | शहरातील अस्वच्छता आणि कचरा ढिगाऱ्यांबाबत नागरिक व स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या.
pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे काही भाग अपघातप्रवणPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छ भारत अभियान आणि उन्नत नाशिक अभियानांतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या 'झीरो ब्लॅक स्पॉट ड्राइव्ह'ला चांगला प्रतिसाद मिळत असून, नाशिक पुणे रस्ता परिसरातील डीजीपीनगर क्रमांक १ जवळील हाय रिस्क ब्लॅक स्पॉट हटविण्यात आला.

pune news
Nashik Gangapur Dam | गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी 14.50 कोटी खर्च

शहरातील अस्वच्छता आणि कचरा ढिगाऱ्यांबाबत नागरिक व स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यानुसार मनपाने गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राजवळील प्रभाग क्रमांक २३ मधील परिसरात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, टाकाऊ साहित्य आणि इतर घनकचरा हटवून परिसर स्वच्छ केला.

ब्लॅक स्पॉट हटविल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्ते, चौक, मोकळी मैदाने, नदीकाठ परिसर आणि वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांची ओळख करून ते कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

pune news
Nashik Murder | भऊर फाटा येथे मेव्हण्याकडून सालीचा चाकूने भोसकून खून; पसार आरोपीला सरपंचांनी पकडले

संबंधित भागात नियमित स्वच्छता, फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे. महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक या संकल्पना पूर्ततेसाठी शहरभर विविध स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

-डॉ. आवेश पलोड, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news