BJP Nashik Politics 2026 | नाशिक मनपात 'मुंबई-पुणे' पॅटर्न? सभागृह नेतेपदासाठी भाजपमध्ये मोठ्या हालचाली, 'या' नावांची चर्चा

BJP Nashik Politics 2026 | भाजपच्या विद्यमान गटनेत्यालाच संधी मिळण्याची शक्यता
Nashik Municipal Election
Nashik MunicipalPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेत सभागृह नेतेपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही गटनेत्यालाच सभागृह नेतेपद देण्याचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सभागृह नेतेपदी भाजपचे विद्यमान गटनेते अॅड. श्याम बडोदे विराजमान होतील.

Nashik Municipal Election
Nashik Agriculture Export Crisis | नाशिकच्या कांदा-द्राक्षाला युद्धाची झळ! 1500 कंटेनर जेएनपीटीवर अडकले; खासदारांची केंद्र सरकारकडे धाव

दरम्यान, सभागृह नेतेपदावर सुधाकर बडगुजर यांच्या नावाचीही चर्चा आहे. तब्बल चार वर्षे रखडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. महापालिकेत भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीची सत्ता आली.

फेब्रुवारीत महापौर-उपमहापौर निवडणूक पार पडल्यानंतर स्थायी समितीच्या रूपाने महापालिकेची आर्थिक सत्ताही भाजपने काबीज केली आहे. आता स्वीकृत सदस्यांसह सभागृह नेतेपद व विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवणाऱ्या शिवसेनेने (शिंदे गट) भाजपसोबत निवडणूक पश्चात युती करत सत्तेत सहभाग घेतल्याने विरोधी पक्षनेतेपदावरील त्यांचा दावा संपुष्टात आला आहे. विरोधी पक्षनेतेपद आता तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवणाऱ्या शिवसेनेकडे (उबाठा) अलगद आले आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी उबाठातर्फे महानगरप्रमुख तथा प्रभाग १५ मधील नगरसेवक प्रथमेश गिते यांच्या नावाचे पत्र महापौरांना सादरही करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर गिते यांच्या नावाची घोषणा होणार, हे आता स्पष्ट आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी मोठी रस्सीखेच असल्याने त्यावरही भाजपसह अन्य पक्षांमध्ये लवकरच नावांची निश्चिती अपेक्षित आहे.

Nashik Municipal Election
Nashik Heatwave Alert | यंदाचा उन्हाळा ठरणार कडक! मार्चच्या मध्यातच तापमान 40 अंशांवर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज

आता सभागृह नेतेपदासाठी महापालिकेत रस्सीखेच दिसून येत आहे. मुंबई, पुण्यात सत्तारुढ पक्षाच्या गटनेत्यालाच सभागृह नेतेपद देण्यात आले आहे. नाशिकमध्येही हा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे.

सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर

भाजपने सभागृह नेतेपदासाठी मुंबई, पुणे पॅटर्न राबवल्यास विद्यमान गटनेते अॅड. श्याम बडोदे हे सभागृह नेते होऊ शकतात. मात्र, सभागृहात पक्षाची भूमिका मांडण्यासाठी अनुभवी सभागृह नेता असणे आवश्यक असल्याने सुधाकर बडगुजर यांचे नाव यासाठी आघाडीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news