Nashik Ghantagadi Workers Indefinite Protest|सेवेत कायमसाठी घंटागाडी कामगारांचे बेमुदत धरणे, काम बंद न करता, सुट्टीच्या वेळेत आंदोलन

Nashik Ghantagadi Workers Indefinite Protest|सेवेत कायमसाठी घंटागाडी कामगारांचे बेमुदत धरणे, काम बंद न करता, सुट्टीच्या वेळेत आंदोलन
Ghantagadi Garbage
Ghantagadi GarbagePudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील घंटागाडी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. या मागणीसाठी घंटागाडी कामगारांनी सोमवार (दि. २३) पासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कामगारांनी काम बंद न करता सुट्टीच्या वेळेत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेत १९९६ पासून घंटागाडीवर कार्यरत सफाई कामगार

शहरातील कचरा संकलन आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडत आहेत. ठेकेदार बदलले, तरी प्रत्यक्ष काम करणारे कामगार तेच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सेवा बजावूनही कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. या कामगारांना कायम कामगारांच्या सेवा शर्ती लागू करण्याचे आदेश न्यायालयाने २०१६ मध्ये दिले होते.

तसेच कामगार उपायुक्तांनी सात टप्प्यांत कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. महापालिकेच्या महासभेनेही २०१६ मध्ये यासंदर्भात कायम करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे कामगारांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सांगण्यात आले. उपमहापौर विलास शिंदे यांनीही कामगारांच्या मागणीसंदर्भात पत्र दिले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्याचे कामगार संघटनेने म्हटले आहे.

Ghantagadi Garbage
Nashik District Consumer Protection Council Appointments-जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २२ अशासकीय सदस्यांची नियुक्ती

दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १० कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षे कचरा संकलनाचे काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांना कायम सेवेत घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनास भाकपसह विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनात महादेव खुडे, रफिक सय्यद, शरद अहिरे, कैलास मोरे यांच्यासह कामगार सहभागी झाले आहेत.

Ghantagadi Garbage
Nashik New Additional Tehsildar Offices|विभागात आठ स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालये, राज्यभरात नऊ कार्यालयांना मंजुरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.