Nashik GST News | जीएसटी अनुदानात यंदा पुन्हा वाढ

Nashik GST News | नाशिक महापालिकेला वार्षिक १,६१६.६४ कोटींचा दिलासा
Kolhapur GST collection |
Kolhapur GST collection | कोल्हापूर परिक्षेत्रात जीएसटीची 9,290 कोटी रु. भर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक नियोजन करीत असलेल्या नाशिक महापालिकेला मोठा दिलासा मिळाला. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या जीएसटी अनुदानात यंदा पुन्हा वाढ झाली असून, शासनाकडून दरमहा १३४.७२ कोटी रुपयांचा हप्ता मंजूर करण्यात आला आहे.

Kolhapur GST collection |
Nashik Murder | भऊर फाटा येथे मेव्हण्याकडून सालीचा चाकूने भोसकून खून; पसार आरोपीला सरपंचांनी पकडले

त्यामुळे चालू आर्थिक वर्षात महापालिकेला एकूण १,६१६.६४ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. राज्यात सन २०१२ मध्ये लागू करण्यात आलेली एलबीटी करप्रणाली नंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी शासनाकडून जीएसटी अनुदान देण्यास सुरुवात झाली.

नाशिक महापालिकेच्या एकूण महसुलात या अनुदानाचा सर्वाधिक वाटा असून, शहरातील विकासकामांसाठी ते महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी जीएसटी अनुदानात सरासरी ८ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होत असते.

Kolhapur GST collection |
Nashik Pre Monsoon Works | मनपाच्या पावसाळापूर्व कामांचा खोळंबा

यंदा शासनाने ११८.१८ कोटी रुपयांची वाढ मंजूर केली असून, मे महिन्याचा पहिला १३४.७२ कोटी रुपयांचा हप्ता महापालिकेच्या खात्यात जमा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला १,३८४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते.

यंदा ही रक्कम वाढून १,६१६.६४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, घाट विकास आणि अन्य पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे वाढीव जीएसटी अनुदानाने महापालिकेच्या विकास आराखड्याला गती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news