Nashik Niphad News : निफाड येथे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Nashik Niphad News : निफाड येथे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Published on
Updated on

निफाड : पुढारी वृत्तसेवा- निफाड येथील वैनतेय विद्यालयामध्ये शिकणारा प्रेम गोपाळ ढेपले(15) आणि त्याचा लहान भाऊ प्रतिक गोपाळ ढेपले (13) या दोघांचा घराजवळील शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू ओढवला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर बुधवार दि. 29 रोजी सकाळी साडेआठ वाजेचे सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले राहणार निफाड यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती. मात्र अर्धा पाऊण तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ त्यांना शोधण्या करता गेली. परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय अशी शंका देखील आली. त्यामुळे जवळपास शोध घेतला असता शेजारच्या शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले. मुले पाण्यात बुडाली अशी शंका येतात सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले मात्र शेततळे गच्च भरलेले असल्यामुळे मुलांचा जीव वाचवण्याची संधी मिळू शकली नाही.

निफाड येथील दुर्घटनेत बळी पडलेले दोघे भाऊ प्रेम ढेपले व प्रतीक ढेपले.
निफाड येथील दुर्घटनेत बळी पडलेले दोघे भाऊ प्रेम ढेपले व प्रतीक ढेपले.

आधी लहान भाऊ प्रतीक तळ्यात उतरला असावा…

प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला त्याला बुडताना बघून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू ओढवला.

दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी

गोपाळ ढेपले यांची दोन्ही मुले या अपघातात मृत्युमुखी पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तीनच महिन्यांपूर्वी गोपाळ ढेपले यांचे वडील जयराम ढेपले यांचेही निधन झालेले आहे. या दुर्घटनेचे वृत्त समजतात परिसरात एकच खळबळ उडाली. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news