

येवला : पुढारी वृत्तसेवा- अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरातील गंगासागर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत ४ कोटी ९६ लाख रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार येवला शहरातील गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासोबत परिसरात हरित क्षेत्रही विकसित करण्यात येणार आहे. परिसराचे सौंदर्यीकरण करून तेथे रस्ता व जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. राज्यात २०१५ पासून अमृत १ योजना कार्यान्वित होती. मात्र, ही योजना राज्यातील मोजक्याच शहरांपुरती मर्यादित होती. आता दुसऱ्या टप्प्यात या योजनेत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत येवल्यातील गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करून याठिकाणी सौंदर्यीकरण करण्यासाठी येवला नगरपालिकेकडून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भुजबळ यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळाली असून, यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के हिस्सा, राज्याचा ४० टक्के हिस्सा, तर नगरपालिकेचा १० टक्के हिस्सा असणार आहे.
हेही वाचा :