
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रस्त्यावरील मातोश्रीगर परिसरातात मोकाट कुत्र्याने चावा घेतलेल्या एक महिला जखमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. हे कुत्रे थेट नागरिकांवर हल्ले करत असून, त्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीदेखील परिसरातील उद्यानात जॉगिंगकरिता गेलेल्या व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात सदर व्यक्ती जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष करून, महिला व मुलांमध्ये या कत्र्यांची अधिक दहशत आहे. कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.
हेही वाचा –