Nashik News | गरजूंना उत्तम उपचारासाठी प्रयत्न करा । CM Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : धर्मादाय मदत कक्ष कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप
नाशिक
नाशिक : धर्मादाय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले आदी.(छाया : रुद्र फोटो)
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने पारदर्शकता आणि संवेदनशीलपणे काम करून समाजातील प्रत्येक गरजूंना उत्तम उपचार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी (मित्रा)च्या वतीने आयोजित मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलिस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते.

नाशिक
Maharashtra CM Fadnavis Says | पालकमंत्री नसले, तरी काही अडलंय का ?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची रचना विश्वस्त भावनेने केली आहे. परदेशातील औद्योगिक, सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळविणारा देशातील पहिला कक्ष आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात करण्याची संकल्पना २०१४ पासून राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची संस्थात्मक रचना उभी केली असून, सामान्य माणसाला मदत होईल, अशी या कक्षाची रचना आहे. आता या कक्षाची जिल्हास्तरावरही स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजाच्या बाबतीतही पारदर्शक आणून दुरुपयोग टाळावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यस्तरीय कक्षाचे प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय तथा प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था डॉ. सुनील भोकरे, सहकक्ष प्रमुख शरद घावटे, उपकक्ष प्रमुख शेखर नामदास, जनसंपर्क अधिकारी डॉ. जगदीश सकवान, वैद्यकीय समन्वयक डॉ. सवानंद सोनार, प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभुते आदी उपस्थित होते.

संकेतस्थळ सुरू करणार

'रुग्ण मित्र' योजना मतदारसंघनिहाय सुरू करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांची फंडासाठी मदत घेणार असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी हे आरोग्यदूत म्हणून काम करतील, असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी प्रास्ताविक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news