Nashik News | मुंढेगावजवळ विहिरीत आढळला माय-लेकींचा मृतदेह, परिसरात खळबळ

Nashik News | मुंढेगावजवळ विहिरीत आढळला माय-लेकींचा मृतदेह, परिसरात खळबळ
Published on
Updated on

इगतपुरी । पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनी जवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरात विहिर आहे. या विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या ३ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रियंका नवनाथ दराणे, वय २३, वेदश्री नवनाथ दराणे, वय ३ असे दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे. दोघीही जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. विहिरीला कठडा नसल्याने जवळ गेलेल्या बालिका विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत दोघींचा ही मृत्यू झाला असावा अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. मंगळवारी भावली धरणात ५ जणांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडल्याने इगतपुरी तालुक्यावर दुःखाचे सावट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news