गंजमाळ परीसरातील 10 ते 15 घरांना अचानक आग लागली आहे.Pudhari News Network
जुने नाशिक : गंजमाळ झोपडपट्टी अमर बुक डेपोच्या शेजारी परिसरात शुक्रवार (दि.21) आज रोजी सकाळी 10 ते 15 घरांना अचानक आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे जवान तसेच आठ ते दहा बंब दाखल झाले आहेत.
आग लागल्यानंतर घरातील सदस्य त्वरीत घराबाहेर पडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मोठा अनर्थ टळला आहे. धुराचे लोट पसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने रहिवाशी नागरीकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

