Nashik News | उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा दौऱ्यावर

Ajit Pawar : सुरगाणा येथे शेतकरी मेळावा; पवार यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
Deputy Chief Minister Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawarfile photo
Published on
Updated on

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. २) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत सुरगाणा येथे शेतकरी मेळावा होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या दौऱ्याला विशेष असे महत्त्व असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. सुरगाणा येथे शुक्रवारी (दि. २) दुपारी १२ वाजता आयोजित शेतकरी मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी ३ ला कळवण बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा तसेच कळवण नगर पंचायतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता नांदुरी ते सप्तश्रृंगीगड रस्ता व नांदुरी बसस्थानकाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे. पवार यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news