

नाशिक : पुढारी आनलाइन डेस्क - भारतीय जनता पक्षाचे आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नाशिकरोड जेलरोड येथील निवासस्थानी राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सोमवार (दि.10) रोजी सदिच्छा भेट दिली.
राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मनस्वी स्वागत करत त्यांचे कुटुंबियांनी औक्षण केले. त्यानंतर आशिर्वाद घेत हरिभाऊ बागडे यांना विठु माऊलीची डिजिटल सुंदर प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी आचार्य तुषार भोसले यांचे कुटुंब यावेळी उपस्थित हाेते. राज्यपाल हरिभाऊ बागडे येणार असल्याने सकाळी 8 वाजेपासूनच जेलरोड भगवा चौक ते शिवाजीनगरपर्यंत बंदोबस्तासाठी नाशिक वाहतूक पोलीस व नाशिकरोड पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
राज्यपालांच्या भेटीनंतर आचार्य तुषार भोसले यांनी त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टावर याचे फोटो शेयर केले आहेत.