नाशिक : वादग्रस्त वक्तव्य करून तेढ निर्माण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गंगागिरी संस्थान गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर येथे गुरुवारी (दि. १५) एका कार्यक्रमात रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होत आहे. शेख राहिल अश्पाक (२३, रा. बागवानपुरा) यांनी ही महाराजांविरोधात फिर्याद दिली आहे.