Nashik News | बँक-आधार लिंक नसल्याने २७ लाख बहिणी ओवाळणीपासून वंचित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : राज्यातील २७ लाख बहिणी बँक-आधार लिंक नसल्याने अपात्र
Majhi Ladki Baheen' scheme
'माझी लाडकी बहीण' योजनाPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत राज्यातून एक कोटी ३५ लाख महिलांनी अर्ज केलेत. याेजनेत पात्र ठरलेल्या बहिणींच्या बँकखात्यात शनिवारी (दि. १७) तीन हजार रुपये जमा हाेणार आहेत. पण, राज्यातील २७ लाख ४३ हजार ३१४ महिलांच्या बॅंकखात्याशी आधार क्रमांक संलग्न नाही. नाशिकमधील एक लाख ४३ हजार ६८३ महिलांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या महिलांना तीन हजारांच्या ओवाळणीपासून वंचित राहावे लागणार आहे.

  • नाशिक विभागात ४,५२,५०६ महिलांचे आधार लिंक बाकी

  • नाशिक जिल्ह्यात १,४३,६३८ महिला ओवाळणीला मुकणार

Summary

राज्य शासनाची महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या योजनेतंर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासन दरमहा एक हजार ५०० रुपये मिळणार आहेत. रक्षाबंधनाची बहिणींना ओवाळणी म्हणून शासनाने जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये पात्र महिलांच्या बँकखात्यात जमा केले आहेत. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महिलेचे बॅंकखाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे. मात्र राज्यभरातून अर्ज केलेल्या २७ लाख ४३ हजार ३१४ महिलांंचे खाते हे आधारशी संलग्न नसल्याचे निदर्शनास आले आहे.

नाशिक जिल्ह्यातून लाडकी बहिण योजनेसाठी सात लाख ३७ हजार अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. त्या पैकी सात लाख १६ हजार अर्ज मंजूर झालेत. तर त्रुटींमुळे उर्वरित अर्ज अपात्र ठरविण्यात आले. या अपात्र अर्जांमध्ये एक लाख ४३ हजार ६८३ लाभार्थ्यांचे आधार बँक खात्याशी लिंक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या महिलांना योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांना मुकावे लागणार आहे.

Majhi Ladki Baheen' scheme
Nashik News | 'भावा'कडून बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच मिळाली मानाची ओवाळणी

.. तरच लाभ मिळणार

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेत आधार व बॅंकखाते संलग्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. अद्यापही ज्या महिलांनी त्यांचा आधार क्रमांक हा बँकखात्याशी जोडलेला नाही त्यांनी तो त्वरीत जोडून घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मंजूर अर्ज असे...

  • बागलाण-42,617

  • चांदवड-34,671

  • देवळा-19,517

  • दिंडोरी-50,273

  • इगतपुरी-30,332

  • कळवण-28,365

  • मालेगाव-98,112

  • नांदगाव- 32,416

  • नाशिक-1,56,982

  • निफाड-64,064

  • पेठ-19,369

  • सिन्नर-46,285

  • सुरगाणा-31,032

  • त्र्यंबकेश्वर-26,767

  • येवला-34,412

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news