Nashik Nandgaon : एसटी बसचा अपघात; चालक-वाहकासह प्रवासी जखमी

Nashik Nandgaon : एसटी बसचा अपघात; चालक-वाहकासह प्रवासी जखमी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव तालुक्यातील गिरनाडॅम वरून नांदगाव कडे येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला असून, या बस मधील चालक, वाहक सह शालेय विद्यार्थी प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. ही बस नांदगाव आगाराची असल्याची माहिती मिळाली आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारा साठी आणले आहे. बसची स्टेरींग फ्री झाल्याने बस वरील नियंत्रण सुटून ती खड्यात गेल्याचे चालक-वाहक यांच्या कडून सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news