Nashik Water Meter | महागडे पाणीमीटर बसवण्यासाठी नागरिकांवर टाकला जातोय दबाव?

Nashik Water Meter | 'क्रॅनबेरी अ‍ॅनालिटिक्स'च्या कामकाजाच्या चौकशीची मागणी
Water Meter
Water MeterPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या पाणीबिल वितरण आणि मीटर रीडिंगचे काम करणाऱ्या 'क्रॅनबेरी अ‍ॅनालिटिक्स' कंपनीच्या कामकाजात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप नाशिक जिल्हा नळजोडणी संघटनेने केला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची दिशाभूल करून विशिष्ट कंपनीचे महागडे पाणीमीटर बसवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा करत संघटनेने पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Water Meter
Mission Chara Plan | जून 2027 पर्यंत नाशिक जिल्हा राहणार पूर्णपणे टंचाईमुक्त; प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी 'मिशन चारा' प्लॅन तयार

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे, नवीन नाशिक शाखाध्यक्ष शिवाजीराव खोडे, खजिनदार तुकाराम महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदन दिले. कंपनीचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाणीमीटर खराब झाल्याचे सांगतात आणि विशिष्ट कंपनीचे मीटर खरेदी करण्यासाठी नागरिकांवर दबाव आणतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

कंपनीला असा अधिकार कोणी दिला, ठेक्यात नेमक्या कोणत्या अटी आहेत आणि ही कारवाई अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून केली जात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

कंपनीचे सुमारे ३०० ते ३५० कर्मचारी कार्यरत असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज दहा नोटिस देण्याचे उद्दिष्ट दिले जात असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या दाव्यानुसार दररोज तीन हजार ते साडेतीन हजार नोटीस दिल्या जात असतील, तर प्रत्यक्षात किती मीटर नादुरुस्त आढळले आणि किती मीटर बदलण्यात आले, याची अधिकृत आकडेवारी महापालिकेने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.

जुन्या जलमापकांचाही हिसाब मागितला
याच कंपनीने काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या मुख्य व वितरण जलवाहिन्यांवर तसेच पाण्याच्या टाक्यांवर प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये खर्चचे जलमापक बसवले होते. या जलमापकांपैकी किती कार्यरत आहेत, किती बंद आहेत आणि किती जलमापक प्रत्यक्ष ठिकाणी उपलब्ध नाहीत, याची पडताळणी करून खर्चाचा हिसाब तपासावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

Water Meter
Mission Chara Plan | जून 2027 पर्यंत नाशिक जिल्हा राहणार पूर्णपणे टंचाईमुक्त; प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी 'मिशन चारा' प्लॅन तयार

मीटरच्या दरातील तफावतीवर प्रश्नचिन्ह

पाणीमीटरच्या किमतीतील तफावत हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. संघटनेच्या माहितीनुसार, बाजारात १५ मिमी आकाराचा मीटर १,४०० ते १,५०० रुपयांना, तर २५ मिमी आकाराचा मीटर ४,००० ते ५,००० रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, 'क्रॅनबेरी अ‍ॅनालिटिक्स'कडून याच आकाराच्या मीटरसाठी अनुक्रमे तीन हजार आणि आठ हजार रुपये आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news