

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या मुदतीत ६६६ उमेदवारांनी माघार घेतली असून, विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष असे एकूण ७२९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. शनिवारी (दि. ३) चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराचा फड रंगणार आहे. शहरातील बहुतांश प्रभागांत तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत.
दरम्यान, अर्ज माघारीसाठी बंडखोरांची मनधरणी करताना पक्षांच्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. गुरुवारपासूनच भाजप प्रभारी तथा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून होते. गुरुवारी रात्रीपासून दुपारी ३ वाजेपर्यंत महाजन यांच्याकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत १२२ जागांसाठी १६७ उमेदवार दिले गेल्याने महाविकास आघाडीतदेखील अर्ज माघारीसाठी नेत्यांची कसरत दिसून आली. शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती झाली असली, तरी जागावाटपाबाबत काही ठिकाणी दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने चर्चेनंतर काही उमेदवारांना माघार घेण्याची सूचना करण्यात आली होती.
मनसेच्या तिघांनी ऐनवेळी माघार घेतल्याने पक्षाची कोंडी झाली. प्रभाग १ मधून ज्ञानेश्वर काकड यांनी माघार घेतली असली, तरी त्यांच्या पत्नी अपक्ष म्हणून रिंगणात कायम आहेत. प्रभाग ३ मधून रुची कुंभारकर यांनी, तर प्रभाग ६ मधून सुनीता पिंगळे यांनी बंडखोरी कायम ठेवली. प्रभाग ५ मधून कमलेश बोडके यांनी बंडखोरी केली.
प्रभाग १० मध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. प्रभाग २४ मध्ये सुरेखा नेरकर यांनी माघार घेतल्याने भाजपमधील बंडखोरी टळली. प्रभाग १७ मध्ये १० अपक्षांनी माघार घेत शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याने पक्षाला ताकद मिळाली. प्रभाग २६ मध्ये भाजपचे दोन एबी फॉर्म होते. पुष्पावती पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज कायम ठेवला.
प्रभाग २५ व २९ या दोन्ही प्रभागांतून दीपक बडगुजर यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला होता. त्यांनी प्रभाग २५ मधून माघार घेतली. मात्र, प्रभाग २९ मधील अर्ज कायम ठेवल्याने, तसेच माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. उमेदवारी अर्ज दाखल करताना तसेच माघारीवेळी या प्रभागात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे प्रभाग २९ हा शहरातील सर्वात ‘हॉट’ प्रभाग ठरला आहे.
प्रभाग १२ क मधून मनसेच्या सुजाता डेरे यांची माघार
प्रभाग १८ मधून मनसेच्या रोहिणी पिल्ले यांची माघार
प्रभाग १६ मधून मनसेच्या मीरा सहाणे यांची माघार
प्रभाग २९ मध्ये भाजपचा एबी फॉर्म मिळालेले मुकेश शहाणे अपक्ष रिंगणात
प्रभाग १० मध्ये भाजपचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांची बंडखोरी
प्रभाग ६ मध्ये भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड यांना कोंडले
प्रभाग १४ मध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून १३ पैकी १० अपक्षांची माघार
माजी नगरसेवक संदीप लेनकर यांची प्रभाग १५ मधून माघार
हर्षा बडगुजर यांच्या माघारीनंतर प्रभाग २५ मधून भाग्यश्री ढोमसे भाजपच्या पुरस्कृत उमेदवार
प्रभाग २५ मधून दीपक बडगुजर यांच्या माघारीनंतर प्रकाश अमृतकर भाजपचे पुरस्कृत उमेदवार
प्रभाग २४ मध्ये सुरेखा नेरकर यांच्याऐवजी पल्लवी गणोरे यांचा अर्ज वैध
प्रभाग १७ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका अनिता सातभाई, सुनीता चव्हाण, जयश्री आढाव, शीतल लोखंडे, हर्षदा पवार, दीपक जाधव, रामदास गांगुर्डे, भक्ती शेलार, दीपलता कपिले, कुंदा सहाणे यांची माघार; शिंदे सेनेला पाठिंबा
प्रभाग १६, २३ व ३० मध्ये एकूण ४३ उमेदवारांची माघार
प्रभाग ७ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा भालेराव यांची माघार
प्रभाग २४ मधून शिवसेनेच्या मंगला भाऊलाल तांबडे यांचा अर्ज मागे
प्रभाग १६ मध्ये शिवसेना (उबाठा)च्या संकेत पगारे यांची माघार
भाजप- महायुतीला पराभूत करण्यासाठी एकत्रित मोट बांधणाऱ्या महाविकास आघाडीतही बिघाडी झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने ८० ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मनसेने ३० ठिकाणी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने ३१ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे.
फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून अनेक बंडखोरांना शांत केले. पक्षामध्ये योग्य सन्मान राखला जाईल आणि संघटनात्मक कामात योग्य पद दिले जाईल, अशी मनधरणी करण्याचे सूत्र पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी अवलंबले होते. फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राज्यभरातील कोणते बंडखोर महत्त्वाचे असून त्यांना शांत करणे आवश्यक आहे, याची यादी तयार केली होती.
रवींद्र चव्हाण यांनाही न जुमानणारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनचा आग्रह धरणारी मंडळी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद झाल्यानंतर शांत झाली. तरीही भाजपचे सुमारे ९० बंडखोर अद्याप रिंगणात आहेत. यातील सुमारे ४० बंडखोर हे निवडून येण्याच्या ताकदीचे असल्याचे मानले जाते.
मावळा फाउंडेशन, सातारा आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून मी आश्वासन देतो की महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची आहे. इतर कोणतीही नाही. कोणत्या वर्षी कोणती भाषा शिकवायची, यासाठी समिती नेमली असून तिचा अहवाल आल्यानंतर तो महाराष्ट्रासमोर मांडला जाईल. साहित्यिक व विचारवंतांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर प्रचंड खटल्यांचा भार आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठात तुलनेने प्रकरणे कमी असून निकाल लागण्याची शक्यता अधिक जलद आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला या खंडपीठाशी जोडणे ही केवळ प्रशासकीय सोय नसून न्यायिक अपरिहार्यता ठरत आहे.